Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी


)- करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी
घेतली जात आहे. सर्व धार्मिक उत्सव घरामध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागात संचलन करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. करोना विरोधात अहोरात्र लढा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून स्वागत केले.करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस मेहनत घेत आहे. धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने संयम बाळगून रमजानमध्ये पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करत रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी संचलन केले.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात