Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

सहकुटुंब अमरण उपोषण



   नेवासा प्रतिनिधी ÷  नेवासा नगरपंचायत समोर नगरपंचायत स्वच्छता सफाई कर्मचारी कोव्हीड योद्धा नाथा साधू चव्हाण यांचे सहकुटुंबासह अमरण उपोषण........
दिनांक 12/11 /2020 रोजी पासून नगरपंचायत स्वच्छता सफाई कर्मचारी कोव्हीड योद्धा नाथा साधू चव्हाण हे आपल्या कुटुंबासह नेवासा नगरपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले होते. त्यांना ऑगस्ट महिन्यात शहरांमध्ये स्वच्छता कामाचे कर्तव्य बजत असताना covid-19 या संसर्ग आजाराचे त्यांना लागन झाले होते.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नगर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये भरती करून उपचार केले त्यातून ते बरे होत नाही तर पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर ते पूर्ण बरे झाल्यानंतर नेवासा नगरपंचायत मध्ये कामावर हजर होण्यासाठी वेळोवळी हजर होऊन सुद्धा त्यांना कामावर घेण्यात आले नव्हते व हजरी रजिस्टर प्रमाणे त्यांचा पगार थांबवण्यात आला होता.
त्यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष कार्यालय अधीक्षक रवींद्र कुमार गुप्ता साहेब यांनी सर्व मागण्या मान्य करून उपोषण सोडवण्यास शब्द दिला यावेळी मी नेवासकर व बसपाचे विकास चव्हाण नेवासा नगरपंचायत चे नगरसेवक सुनील वाघ साहेब राजेंद्र मापारी सतीश गायके बापू जामदार,शांताराम गायके लक्ष्मण चव्हाण, या  सर्वांनी मिळून उपोषण सोडण्यास सहकार्य केले.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात