🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

स्वच्छ व निर्मळ पाणी मिळण्यासाठी उपोषण


श्रीरामपूर प्रतिनिधी : श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याबाबत  जे जे फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जोयेफ युनुस जमादर यांनी  मुख्य अधिकारी साहेब नगरपरिषद श्रीरामपूर यांच्या कार्यालयात निवेदन  दाखल केले होते त्या निवेदनात त्यांनी नमूद केले की श्रीरामपूर नगर परिषदेकडून गेल्या अनेक दिवसापासून बेचव रंगहीन गडूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे अनेक नागरिकांना त्यामुळे थंडी ताप सर्दी खोकला यांसारखे आजार होत आहे सध्या करोणा महामारी काळात स्थानिक दवाखाने हे वरील लक्षणे असल्यास दवाखान्यामध्ये उपचार करत नाही अनेक वेळेस नागरिकांनी श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये अधिकारी पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार दिली परंतु आज पर्यंत त्या तक्रारींवर कोणतीही सुधारणा केलेली नाही

सबब सोमवार दिनांक: ७/१२/२०२० रोजी पासून श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर स्वच्छ व निर्मळ पाणी मिळण्यासाठी उपोषण व घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले या वेळी भारतीय लहुजी सेना, राकेश भाऊ कापसे जिल्हा अध्यक्ष (RPI) , रॉकी भाऊ लोंढे जिल्हा उपाध्यक्ष  (RPI) , इम्रान भाई शेख प्रदेशअध्यक्ष छावा स्वराज्य सेना, एस एस गायकवाड राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती युनिट श्रीरामपूर,
यांनी जाहीर पाठिंबा दिला

No comments:

Post a Comment

Comments system