🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

श्रीरामपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अमरण उपोषण


श्रीरामपूर प्रतिनिधी : श्रीरामपूर नगरपरिषद  प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांनी आज रोजी दिनांक ०९/०२/२०२१ रोजी श्रीरामपूर नगरपालिका कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहेत ऊपोषणाचे कारण असे की श्रीरामपूर नगरपालिकेच्या  कचरा साफ करणारे कर्मचारी यांचे थकित वेतन रुपये ७५  हजार लक्ष व सेवानिवृत्त व कायम कर्मचारी यांच्या एकूण थकीत रकमा रुपये सहा कोटी ८० लक्ष जवळपास व इतर प्रश्नांबाबत  नियोजित अमरण उपोषण सुरू केले आहे माहिती अशी की १) घनकचरा थकित पाच महिन्याचा पगार ७५,००,०००  व २) पेन्शन १,२५,००,००० व ३) सेवानिवृत्ती देय रक्कम  १,६७,००,००० व ४) सहाव्या वेतन आयोगाचा फरक ३३,००,००० व ५) सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता १,२०,००,००० व  ६) पदोन्नती चा फरक १,६०,००,००० एकूण रक्कम जवळपास ६,८०,००,०००







त्याच बरोबर कायम सेवानिवृत्त व घनकचरा कर्मचारी यांचे बऱ्याच वर्षापासून खालील प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी उपोषण करीत असल्याचे सांगितले  १) अवार्ड च्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून कामगारांच्या दोन पिढ्या या प्रश्नावर लढा देत आहेत २) नगर जिल्ह्यातील इतर नगरपरिषद प्रमाणे आपल्याही नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांना मेडिकल बिल ची सुविधा मिळावी ३) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सण २००९ मध्ये कामगार विश्वास सजनी का कामगारांच्या नावे हस्तांतर झाली असून त्या सदनिकेची रमाई आवास योजनेअंतर्गत बांधकाम परवानगी मिळण्यासाठी ४) पुरुष कायम कामगारांना गत आठ वर्षांपासून शासकीय गणवेश दिला नाही यासाठी ५) १३३ कायम कर्मचाऱ्यांपैकी फक्त ६३ कर्मचाऱ्यांना सदनिका असून उर्वरित कर्मचाऱ्यांना शासकीय सदनिका मिळण्यासाठी ७) बँक महाराष्ट्र तर्फे दरवेळी पगार खात्यावर जमा करण्यात दप्तर दिरंगाई होते व खूप मोठ्या    प्रमाणात नेहमी गर्दी असते व बँकाच्या कर्मचारी वृंद नेहमी अरेरावीची भाषा वापरतात त्यामुळे इतर राष्ट्र कृत बँकाआत पगार व पेन्शन खाते उघडण्यात यावे यासाठी अमरण उपोषण करण्यात आले असल्याचे समजते 

हे प्रश्न सुटतील का हा सर्वात मोठा प्रश्न जनतेला पडला आहे

No comments:

Post a Comment

Comments system