Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

रोटरी क्लब च्यावतीने प्रशासकीय कार्यालयात वृद्धास बसण्यासाठी बाकडे (बॅचेस) तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे स्फुर्त

श्रीरामपूर(वातार्हर)-  रोटरी क्लब च्यावतीने प्रशासकीय कार्यालयात वृद्धासाठी व अपंग साठी बसण्यासाठी बाकडे (बॅचेस) तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे स्फुर्त करण्यात आले.  
         उत्कृष्ट तहसिलदार म्हणून  तहसीलदार  प्रशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर रोटरी क्लब तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांचा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भारत गिडवाणी  यांनी सत्कार केला यावेळी सचिव हरसुख पदमाणी ,प्रेम नारा ,निलेश चुडीवाल,सरबजितसिंग चूग,बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते . 
       तहसीलदार प्रशांत पाटील  यांनी कोरोना काळात श्रीरामपूर तालुक्यातील जनतेशी संवाद साधून जनतेची कामे मार्गी लावली आहे . याबद्दल जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील कोरोना काळात सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारे तहसीलदार म्हणून प्रशांत पाटील यांना  पुरस्कार देण्यात आला . 
 यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात कोरोना काळात सर्वानीच सहकार्य केल्यामुळें आपणास हे पुरस्कार मिळाला आहे. रोटरी क्लब ने सत्कार केल्या बद्दल त्यांनी आभार मानले. 
        कार्यक्रमचे सुत्रसंचालन व आभार हरसुख पदमाणी यांनी मानले 
श्रीरामपूर-  रोटरी क्लबतर्फे
उत्कृष्ट तहसिलदार म्हणून  तहसीलदार  प्रशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भारत गिडवाणी यांनी केला यावेळी सचिव हरसुख पदमाणी ,प्रेम नारा ,निलेश चुडीवाल,सरबजितसिंग चूग,बाळासाहेब पाटील आदी हजर होते
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात