Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

न्याहळोद येथे रंगली कुस्त्यांची दंगल गेल्या वर्षी लॉकडाउनच्या खंडानंतर पुन्हा उत्स्फूर्त प्रतिसाद




न्याहळोद कुस्ती स्पर्धेत मल्लांचा सहभाग..!

शिर्डी शहर प्रतिनिधी : न्याहळोद येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले, यावेळी विविध गावातील मल्लांनी सहभाग नोंदवून आकर्षक बक्षिसे मिळवली. कित्येक दिवसापासून कोरोनाकाल खंडा मुळे बंद पडलेल्या कुस्ती क्षेत्राला येथे नुकताच सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. न्याहाळोद हे कुस्त्यांचे माहेरघर असून येथे दोन तालमी असल्याने पैलवान देखील मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु कुस्त्या व्यवस्थित रित्या होत नसल्याने प्रेक्षकांना मनसोक्त कुस्त्या पाहण्याचाआनंद घेता येत नसल्याने गावात कुस्त्या साठी स्टेडियम बांधण्याची मागणी होत आहे. येथे विविध गावातील पैलवानांनी कुस्ती खेळात सहभाग नोंदवला असून त्यात धुळे, जळगाव, अमरावती, अहमदनगर, नाशिक, कापडणे, नेर, वरखेडी, खोरदळ मोरदळ, कौठळ, बिलाडी आदी गावातील मल्लांनी सहभाग नोंदवला विजेत्या मल्लांना आकर्षक भांडी व रोख रक्कम अदा करण्यात आली. यावेळी सचिन शिरसाट यांच्या स्मरणार्थ, सुरसिंग पहिलवान यांच्या स्मरणार्थ तसेच माजी कृषी सभापती बापू खलाणे यांच्यामार्फत आकर्षक ढाली विजेत्या मल्लाना देण्यात आली. कुस्त्यांचे उद्घाटन येथील ज्येष्ठ नागरिक व माजी उपसरपंच देविदास जिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी तसेच माजी कृषी सभापती बापू खालाने यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्तीत पंच म्हणून देवाआण्णा जिरे पहिलवान, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर रोकडे, आमीन शेख, सावकार कोळी, पुंडलिक कोळी, सुनील धोबी, बाबा कोळी, आमीन शेखपहिलवान, आदींनी पंच म्हणून काम पाहिले, कुस्त्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील पवार, नामदेव रोकडे, विशाल रायते, ज्ञानेश्वर भोगे, सचिन माळी, राहुल शेटे, रावसाहेब भोगे, रोहिदास कोळी, संजय भिल आदींचे सहकार्य लाभले.



न्याहळोद हे कुस्त्यांचे माहेरघर असून, कुस्त्या खेळवताना येथे नेहमी रिंगण मुळत असते. यामुळे प्रेक्षकांना मनसोक्त कुस्त्या पाहायला मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होतो, तरी येथे मोठे स्टेडियम बांधणे गरजेचे आहे.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात