🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

नगरपंचायतमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना तातडीने लसीकरण करून मिळावे - नगरसेविका गोंदकर


शिर्डी शहर प्रतिनिधी : शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेविका सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर यांनी २२ जुलै २०२१ रोजी शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थान लसीकरण केंद्रावर नागरिकांना येणाऱ्या काही समस्या निवेदनाद्वारे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे साहेब यांना कळवल्या होत्या. नगरपंचायत कार्यालयात नागरिकांच्या  नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. परंतु नगरपंचायत कार्यालयामध्ये नागरिकांनी आपल्या नावाची नोंद करून त्यांना अजून पर्यंत लसीकरणाबाबत कोणती माहिती कळविण्यात आली नव्हती. याची माहिती महिला मोर्चा च्या व शिर्डी नगरपंचायत च्या नगरसेविका सौ.वंदनाताई राजेंद्र गोंदकर, सौ.मनीषाताई सचिन शिंदे, सौ. सुरेखाताई मंगेश रनमाळे यांना समजताच त्यांनी तत्काळ श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ठाकरे साहेब यांची भेट घेऊन या विषयांवर चर्चा केली. या वेळी नगरपंचायत मध्ये नाव नोंदणी करणारे कर्मचारी नाव नोंदणीचे रजिस्टर सोबत घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होते व नगरपंचायत कार्यालयामध्ये नोंदणी होत असलेल्या नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण होण्यासाठीचे स्मरणपत्र ( निवेदन) श्री साईबाबा संस्थान चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकरे साहेब यांना दिले. तसेच, १)जसे मंदिर सुरू झाल्यावर दोन डोस पुर्ण झालेल्या नागरिकांना समाधी मंदिराचे दर्शन मिळेल. तसेच शिर्डीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन दोन डोस लवकर पुर्ण केले पाहिजे. २) लसीकरण बाबतची नोंदणी ही फक्त नगरपंचायत मध्येच होईल. या ही मागण्याया वेळी मान्य केल्या.

No comments:

Post a Comment

Comments system