🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

आखील भारतीय छावा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन होणार असल्याचा इशारा


श्रीरामपूर  प्रतिनिधी:तालुक्यातील कारेगाव -खोकर,अशोकनगर फाटा ते अशोकनगर, या रस्त्याचे सुरू असलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून याबाबत आपल्याकडे लेखी तक्रारअखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांनीदेऊन  वेळोवेळी आंदोलन केले. परंतु या कामा बाबत ना ठेकेदारास नोटीस बजावली ना संबंधीत अभियंत्यांवर कारवाई केली. अधिकारी हे ठेकेदार व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने या निकृष्ठ कामास जबाबदार  संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अधीक्षक अभ्यंत्याना दिलेल्या निवेदनात दिला आहे

 या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत आपण प्रभारी उपभयंता गुजरे यांची चौकशी करून , श्रीरामपूर विभागाला कायमस्वरूपी उपअभियंता  उपलब्ध करून घ्यावा कारण गुजरे यांचेकडे या कामाची पावसाळ्यात झालेली   खराबी बाबत विचारणा केली असता पाहणी करण्यास  वेळ मिळत नाही अशी उत्तरे दिली जातात. तसेच प्रभारी उपअभियंत आणि कार्यकारीअभियंता संगमनेर विभाग हेच जर या निकृष्ट दर्जाचे कामाची पाठराखण करत असतील तर   यांच्याकडे कारेगाव -खोकर,अशोकनगर फाटा(निपणीवडगाव)ते अशोकनगर रस्त्या बाबत लेखी तक्रार देण्यातआली असून आंदोलन (लाक्षणिकउपोषण) केले  असता आजपर्यत कोणतीही पाहणी अथवा कारवाई नाही त्यातच कारेगाव -खोकर  रोड पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून 12 जुलै 2021 पासून आजपर्यत त्याची डागडुजी करण्याची सूचना ठेकेदारास दिलीनाही कारण विचारले असता माझेकडे वेळच नाही असे बेजबादारपणे उत्तर दिले जाते. 
तसेच अशोकनगर फाटा तेअशोकनगर रोड साईडपट्टी साफ न करता तेथील अतिक्रमण न हटवता प्रवरा डावा कालव्याच्या पाण्यासाठी योग्य चर न खोदता भर पावसात आणि वाहत्या पाण्यात डांबर टाकून बी बी एम चा थर दिला त्याची विचारणाकेली असता रोड जिल्हा परिषद चा आहे आम्ही साईडपट्टी अतिक्रमण काढू शकत नाही साईड पट्टी ला जागा नसेल तर ते बिल काढणार नाही मगरस्ता करताच कशाला विचारलेअसता आम्ही फक्त एजन्सी म्हणून काम करतो. आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग ही एजन्सी निवडली आहे ,त्याचप्रमाणे कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्ता हा अतिशय खराब झाला असून त्याची दुरुस्ती कडीत मांडवे शिवारात चालू आहे. तेथेही साईडपट्टी अतिक्रमण काढले नाही, पढेगाव ते कारेगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडले ते दगडुज्जी साठी घेतले नाही रोड क्रॉस पाईपलाईन ला अनधिकृत मूक संमती देऊन रस्त्याचं नुकसान केलेलं आहे 

याप्रकरणी अधीक्षकअभियंता अहमदनगर कार्यालयावर दि ९ सप्टेंबर रोजी घेरवो घालून धरणे आंदोलन  आखील भारतीय छावा  संघटनेच्या वतीने होणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 

निवेदनावर- नितीन पटारे, जिल्हाध्यक्ष, छावा यांची स्वाक्षरी आहे निवेदनाच्या प्रति  जिहाधिकारी अहमदनगर,पोलीस अधीक्षक  अहमदनगर याना पाठविण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Comments system