श्रीरामपूर प्रतिनिधी : तालुक्यातील निमगाव खैरी येथील रहिवासी व नागेबाबा परिवारात आरोग्यदूत म्हणून कार्यरत असलेले सुभाष गायकवाड यांची नुकतीच आदिवासी संरक्षण परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष राजेश नागपुरे यांच्या हस्ते ठाणे येथील कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
ठाणे येथील परिषदेच्या कार्यालयात झालेल्या समारंभास राष्ट्रीय सचिव सुनील तांगडी, महाराष्ट प्रदेश अध्यक्ष दयानंद उल्मिक, किर्ती नागपुरे या मान्यवरांच्या उपस्थितीत गायवाड यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर शपथविधीही याच ठिकाणी पार पडला.
यावेळी नागपुरे म्हणाले, गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील अनेक गरजू रूग्णांना आपल्या कार्याच्या माध्यमातून जीवनदान दिले, आर्थिक मदत मिळवून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांना राष्ट्रीय उपाध्यपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास नागपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.
गायकवाड यावेळी म्हणाले, परिषदेने माझ्यावर विश्वास टाकून मोठी जबादारी माझ्यावर सोपविली आहे. त्या जबाबदारीस सार्थ ठरण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करील. आरोग्य क्षेत्रातील आतापर्यंतच्या अनुभवाचा वापर करून आदिवासी समाजातील तळागाळाच्या घटकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हे माझे प्रयथम कर्तव्य असेल, असे गायकवाड म्हणाले.
गायकवाड यांच्या या निवडीबद्दल नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे, पत्रकार रमेश कोठारी, प्रभाकर भोंगळे, सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते, वैद्य,माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष महेश दारुंटे, पवार, विलास कुदळे, धोबी समाज संघटनेचे नेते लक्ष्मण निकम, विजय कुदळे, अनिल राऊत, सुरेश गिरमे, जानराव, प्रभाकर पिसे, सुरेंद्र गिरमे, सुरेश कुऱ्हे, जालींदर कुऱ्हे, एकनाथ दुधाळ, राजन गिरमे, आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment