Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

एकलहरे गावात लसीकरण संपन्न


एकलहरे प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे  गावांमध्ये   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी  दिनांक २३/८/२०२१ सोमवार रोजी , लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्रबेलापूर,यांचे मार्फत सकाळी १० वाजता  आधार कार्ड  प्रमाणेच नाव नोंदणी नंबर घेतले गेले  २०० कोविड लस  डोस उपलब्ध होते सर्वसाधारण वय वर्ष कमीत कमी १८ पासुन पुढे सर्व महिला व ग्रामस्थांना देण्यात आले .
 पहिला आणि दुसरा लस डोस दिला गेला दुसरी लस साठी पहीला डोस घेऊन कमीत कमी ८४ दिवस पूर्ण झाले अशाच व्यक्तींना प्रथम प्राधान्याने दुसरा लसींचा डोस दिला गेला .लस डोस फक्त गावातीलच लोकांना व उक्कलगाव येथील फक्त ८४ दिवस झालेल्या ग्रामस्थांना दुसरी लस दिली गेली कारण एकलहरे गाव कोरणा मुक्त
करण्यासाठी प्रथम प्राधान्य गावातील लोकांना असेल अशी माहिती सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिली या वेळी बेलापूर आरोग्य केंद्रातील डॉक्टर व त्यांचे सहकारी , एकलहरे ग्रामपंचायत सरपंच , सौ: रिजवाना अनिस शेख,ग्राम विकास अधिकारी , समीर मणियार भाऊसाहेब,उपसरपंच श्री रमेश रामभाऊ कोल्हे,व सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ ठोंबरे, श्री राजू अग्रवाल माजी सरपंच सदस्य, अन्सार भाई जागीरदार, अर्जुन दादा मकासरे माजी ग्रामपंचायत सदस्य, सुलतान भाई जागीरदार, राहुल दाभाडे, सुभाष शिंदे, प्रगती शील शेतकरी, बाळासाहेब शिंदे, अनिल कांबळे, विश्वास काळे, राजू निकम, नसीर जागीरदार, आदींनी सहकार्य केले,लसीकरण साठी आलेले सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून अतिशय व्यवस्थितपणे कोरोना चे नियम पाळून लसीकरण घेतले. सर्व डॉक्टर व सिस्टर आशा सेविका यांचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन अनिस भाई यांनी केले.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात