श्रीरामपूर(वार्ताहर) :- येथील बोरावके महाविद्यालयचा विद्यार्थी अथर्व रत्नाकर कोरडे यांची राष्ट्रीय योगा फेडरेशनच्यावतीने घेतलेली योगा फेडरेशनच्या कपमध्ये आर्टिस्टिक योगा प्रकारात भारतात पाचवा क्रमांक मिळवला त्यांचा दिगबर जैन समाजाच्यावतीने नगराध्यक्षा अनुरधाताई आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलिवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, गुलाबचंद झांजरी, मयुर पाटणी, विरसेवादल चे अध्यक्ष प्रतिम पांडे, सुभाष चुडिवाल, राजेद्र पाटणी, अजय चुडिवाल, जितेद्र अग्रवाल,सुरेश झांजरी, सुनिल कासलिवाल,सुहास चुडिवाल,जितेद्र कासलिवाल,प्रशांत आर पाटणी, रत्नाकर कोरडे ,जतिन सोलकी, अर्चना पानसरे, जयश्री जगताप आदि उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले, अथर्व कोरडे यांने श्रीरामपूरचे नाव देश पातळीवर रोशन केले आहे. त्यांने असेच खेळत रहावे व भविष्यात ऑलम्पकिमध्ये त्यास खेळण्याची संधी मिळावी हिच श्रीरामपूरकराची इच्छा असल्याचे त्यांनी सागितले.
अथर्व कोरडे याला योग गुरु जतिन सोलकी सर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. यापुर्वी हि अथर्व यांने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय चॉमपियनयोगा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करुन भारतात दुसरा क्रमाक पटकावला तसेच गोलेयर, छत्तीसगढ, विविध राष्ट्रात योगा संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी श्रीरामपूर शहराचे व नगर जिल्हाचे नावलौकिक केले आहे. अथर्व याला गायन,वादन, स्वअक्षर, विज्ञान यासह विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. यावेळी प्रस्ताविक संजय कासलिवाल यांनी केले तर आभार प्रतिम पांडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment