Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

निराधार दिव्यांग व्यक्तीस प्रहारचा आधार..!


शिर्डी प्रतिनिधी : राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या अथक परिश्रमातून कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील दिव्यांग बांधव कुणाल अबक यांना जिल्हा रुग्णालयाचे अपंग प्रमाणपत्र मिळवून देण्यात यश आले आहे. जिल्हा रुग्णालयाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हे कुटुंब तब्बल पाच वर्षापासून नगरच्या जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारत होते. त्यानंतर ह्या दिव्यांग बांधवानी, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिंदे यांच्याकडे मदत मागितली असता, केवळ आठवड्याभरात ह्या दिव्यांग बांधवांस हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या कामगिरीबद्दल शिंदे यांचे कौतुक करण्यात येत आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात