Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

गणेश चित्रांचे ‘ऑनलाईन’ प्रदर्शन



श्रीरामपूरच्या चित्रकार रवी भागवत यांचा सहभाग

श्रीरामपूर प्रतिनिधी: कार्टून्स कट्टा या हास्य-व्यंगचित्रकारांच्या ग्रुपने देशभरातील चित्रकारांच्या गणेश चित्रांच्या ऑलाईन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. श्रीरामपूर येथील चित्रकार रवी भागवत यांच्या ‘श्री’ असे नाव असलेल्या चित्राचीही या प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

            अहमदनगर येथील प्रमोद कांबळे, पुणे येथील घनश्याम देशमुख, अस्मिता शहा, मुंबई येथील राम बांगड, कोल्हापूर येथील प्रियंका चिवटे, सातारा येथील तुषार रोकडे, मिरज येथील नितीन आपटे, कोलकाता येथील रंजना सरकार, नवी दिल्ली येथील रामचंद्र पोकाले यांच्यासह देशभरातील १०० हून अधिक चित्रकारांना या प्रदर्शनात सहभाग आहे. यात सर्व चित्रकारांच्या ५० हून अधिक शैली व माध्यमांमध्ये साकारलेले विविध गणेश चित्रांचा आनंद कला रसिकांना घेता येणार आहे. कार्टून्स कट्टा ग्रुपच्या फेसबूक पेजवर ऑनाईल प्रदर्शनाची लिंक उपलब्ध असून कलारसिक याठिकाणी भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतात.

 

   

        येथील चित्रकार भागवत यांनी साकारलेल्या १८ इंच बाय २४ इंच आकाराचे सॉफ्ट पेस्टल्स ऑन टिंटेड पेपर या माध्यमातील ‘श्री’ या नावाच्या गणेश चित्राची निवड समितीने निवड केली आहे. भागवत गेल्या २० वर्षांपासून चित्रकला व व्यंचित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. ११ विविध माध्यमांमध्ये चित्र काढण्याचा त्यांना अनुभव असून त्यांचे गुरू भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत त्यांनी हजारो चित्रे आपल्या शैलीत रेखाटून कलारसिकांना मंत्रमुग्ध कले आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम श्रीरामपूर येथे आले असता त्यांच्यासमोर भागवत यांनी त्यांचे अर्कचित्र काही मिनिटात साकारून कलाम यांची थाप मिळवली होती. यापूर्वी त्यांची श्रीरामपूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर आदी ठिकाणी चित्र तसेच व्यंगचित्रांची प्रदर्शने भरली आहेत. 


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात