श्रीरामपूर प्रतिनिधी: शासकीय अन्नधान्य पुरवठा गोदामातील हमाल कामगारांना कायमस्वरूपी माथाडी मंडळाच्या नोंदणीच्या पावत्या कॉ. बाबा आरगडे यांच्या हस्ते नुकत्याच वाटप करण्यात आल्या.
यावेळी हुंडेकरी तथा माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे, हमाल मुकादम शंकर वायकर, रविंद्र आजगे, सतिश जामदार, आनंदा साळवे आदींच्या प्रमुख उपसथितीत या पावत्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी कॉ. आरगडे म्हणाले, येथील हमाल कामगारांची नोंदणी आता माथाडी मंडळामध्ये झाली आहे. भविष्यायाचा फायदा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. त्यासाठी सर्व कामगारांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे. सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी साबळे म्हणाले, शासनाकडून येणारा शिधा गोरगरीब नागरिकांना पर्यंत पोहविण्यामध्ये आपल्या हमाल कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर शिधा पोहचावा यासाठी आपण सर्वांनी कुठलीही कुचराई न करता तप्तरतेने काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी हमाल कामगार विजय मापारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बाजीराव गाडे, वसंत साळवे, शंकर वायकर, अर्जून गोर्डे, सोमनाथ गाढे, अंकूश साळवे, गोपीनाथ सुपेकर, हर्षद पठाण, किशोर बेंद्रे, सचिन साळवे, किरण तुपे, अशोक साळवे आदी मोठ्या संख्येने कष्टकरी कामगार उपसथित होते. यावेळी सुत्रसंचालन आनंदा साळवे यांनी केले तर आभार रविंद्र आजगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment