🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

बाल ब्राहमचारी वृषभ जैन यांची दिगंबर जैन मुनी दिक्षा 8 डिसेंम्बर ला आचार्य कुणथुसागर महाराज यांच्या हस्ते


श्रीरामपूर(वातार्हर)- बाल ब्राहमचारी वृषभ जैन यांची दिगंबर जैन मुनी दिक्षा 8 डिसेंम्बर ला आचार्य कुणथुसागर महाराज यांच्या हस्ते होत असून त्या निमित्ताने त्यांचा  खोळ भरण्याचा कार्यक्रम पुणतांबा व श्रीरामपूर येथे संपन्न झाला यावेळी जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       आ क्षमाश्री माताजी यांच्या सानिध्यात नऊ वर्षेपासून वृषभभैया होते त्यांनी त्यांना धर्म साधनेची शिकवण दिली त्यांना धर्मच्या मार्गावर लावले आता ते आचार्य कुनथुसगर महाराज कडून दिक्षा घेत आहे . 
     ठिकठिकाणी त्याचे स्वागत होत आहे कचनेर ,औरंगाबाद, अडुळ ,पुणतांबा, श्रीरामपूर, कोपरगाव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणतांबा येथे श्वेतांबर समाजच्या आ सुहिताजी मासा यांच्या वतीने सकल जैन समाजाच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. जैन स्थानकात माताजींनी आशीर्वादपर प्रवचन केले . धर्म साधनेच्या मार्ग आवलंबल्या बद्दल त्याचे कौतुक केले यावेळी श्रीरामपूर च्या संगीत कासलीवाल या ही उपस्थित होत्या. 
      श्रीरामपूर येथे पार्शवनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये वृषभभैया याचे स्वागत करण्यात आले त्याच्या समवेत असलेले प्रसन्न पाटणी (औरंगाबाद) याचे ही स्वागत करण्यात आले.
      यावेळी वृषभभैय्या यांनी जैन धर्माच्या त्यागा विषयी सांगितले.
      यावेळी श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, ऍड अनिल कासलीवाल, विश्वस्त गुलाब झांजरी ऍड सुहास चुडीवाल, जितेंद्र कासलीवाल, मयुर पाटणी ,विरसेवा दलाचे माजी अध्यक्ष राजू पाटणी, रमेश पाटणी, तेजस गंगवाल, राजेंद्र बडजाते, पलाश पाटणी, यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Comments system