🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कवी आनंदा साळवे यांना ‘लोककवी’ पुरस्कार जाहीर



श्रीरामपूर प्रतिनिधी -निमगाव वाघा (ता. नगर) येथील स्व. किसनराव पा. डोंगरे प्रतिष्ठाण व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘लोककवी’ हा पुरस्कार या वर्षी तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ग्रामिण कवी आनंदा साळवे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार समारंभाचे आयोजक प. नाना डोंगरे यांनी ही माहिती दिली आहे.

या पुरस्काराचे वितरण आज रविवार दि. ३ रोजी सकाळी १० वा. निमगाव वाघा येथील न्यू मिलन मंगल कार्यालयात होणा आहे. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी सभापती सुरेखा पुंड, डॉ. माधवराव लामवडे, डॉ. दिलीप पवार, संभाजी दहातोंडे, प्रा. डॉ. शैलेंद्र भनगे, डॉ. गुंफाताई कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपसथित राहणार आहेत.

साळवे यांना आतापर्यंत राज्य भरातून ५० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक नामवंत कवी संम्मेलनांसाठी कवी साळवे यांना निमंत्रित केले जाते. हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कवी साळवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Comments system