कृतिशील निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड
अहमदनगर –ज्येष्ठ नागरिक हीच राष्ट्राची संपत्ती आहे. सेवानिवृत्तांची शासकीय स्तरावर, समाजात होणारी हेळसांड थांबविण्यासाठी, ज्येष्ठांना आधार व त्यांच्या समस्या निराकरणासाठी कृतीशील निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना कटिबद्ध असल्याची ग्वाही अहमदनगर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभियंता मनोहर पोकळे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कृतिशील निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना, पुणेच्या अहमदनगर जिल्हा स्थापना व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रम न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालात पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिवदास साळुंके, टी.के.गुरव, इंजि. गिरीष सांगळे, भारत बेंद्रे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ मदन पवार, श्री. क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष म्हणून अभियंता पोकळे,उपाध्यक्ष डॉ. आसाराम खाडे, दिलीप रुपवते, सुनील पावले,रावसाहेब निमसे, सचिव सयाजीराव वाव्हळ, सहसचिव दिलीप थिटे, कोषाध्यक्ष नागनाथ बोल्ली, सहकोषाध्यक्ष अनिल भागवत, संघटक गोरक्षनाथ थोरात, भानुदास तिखांडे, बाबासाहेब कणगरे, शिवाजी भगत, अशोकराज आहेर, मकरंद भारदे, श्रीमती लता तोरणे, विशेष निमंत्रित म्हातारदेव खाडे, शिवाजी राजळे, सुभाष मोरे, श्याम भोकरे, मदन पवार म्हणून यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विविध सभा घेऊन संस्थेची कार्यकक्षा, सेवानिवृत्तांची शासकीय पातळीवर व समाजात होणारी हेळसांड व त्यासाठी संस्थेकडून अपेक्षा व उपाययोजना इ., संस्थेच्या कामाचे नियोजन, संस्थेपुढील भविष्यातील आव्हाने, संस्था बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदविणे, कोविडमुळे आलेली शिथीलता दूर करणे, वन रँक वन पेंशन, आमदारांना ज्याप्रमाणे त्यांची हयातीनंतर संपूर्ण पेंशन शासनाने मंजूर केली, त्याप्रमाणे निवृत्त अधिकारी, कर्मचारी सदस्यांना लागू करणे, जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी इ. बाबींसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. यासाठीचे महत्त्व या कार्यक्रमात पदाधिकारी यांनी विषद केले. संघटनेचे २०२ सभासद करुन घेण्यात आले, असल्याचेही अभियंता पोकळे यांनी सांगितले. प्रास्ताविक रुपवते यांनी तर सूत्रसंचालन सयाजीराव वाव्हळ यांनी केले.
No comments:
Post a Comment