🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

ई-निविदा प्रकरणी ग्रामसेवकासह गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू




अखिल भारतीय छावा संघटेच्या मागणीनुसार आयपी ॲड्रेस तपासले जाणार- नितीन पटारे

 श्रीरामपुर प्रतिनिधी : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अखिल भारीतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-निविदा प्रकरणी पुरावे देऊन लेखी तक्रारी करून वेळोवेळी आंदोलन करून ग्रामसेवकांसह गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यास भाग पाडले.

            ई-निविदा प्रकरणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी असलेली नियमावली  (अटी शर्ती) साठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे उपोषण करून दि. १६ ऑक्टेबर २०२० रोजी सर्व जिल्ह्यासाठी एकच नियमावली तयार करन कामाचा अनुभव, सारख्या कामाचा दाखला, मजूर संस्था तालुका कार्यक्षेत्र मर्यादित करणे, स्थळ पाहणी अहवाल, तीन वर्षांचे आयटी रिटर्न, कामगार कल्यान निधीची (पीपीएफ) अशा अनेक जाचक अटी रद्द करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच नियमावली तयार केली.

            परंतू तरी देखील अनेक ग्रामपंचाततींनी/ पंचायत समितीने  ई-निविदा प्रसिद्ध करताना जिल्हा परिषेदेने रद्द ठरविलेल्या जाचक अटी लादून पुन्हा ई-निविदा प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप केला. त्याची पुराव्यानिशी चौकशी केली असता या सर्व ई-निविदा खासगी ठिकाणी प्रसिद्ध होऊन खासगी संगणक चालकांनी या नियम अटी मनमानी पद्धतीने सामाविष्ट केल्याचे आढळून आल्याने तसेच खासगी ठिकाणी निविदा प्रसिद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने कोणत्याही प्रकारचा खासगी संगणक चालकाशी कोणताही करार न केल्याने त्यांच्यावर कारवाई न करणे क्रमप्रत असल्याने जिल्हयातील आठ ग्रामसेवकांची विभागीय चौकशी चालू असून ३ गट विकास अधिकाऱ्यांना समज देण्यात आली. असे ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्रशासन यांनी लेखी कळविले असून त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे खासगी ठिकाणी होणाऱ्या निविदेचे आयपी ॲड्रेस तपासून कारवाई करण्याच्या पत्राची आठवण करून देत कारवाईची मागणी लावून धरली. त्यानुसार पुन्हा ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांनी पंचायत समिती स्तरावरील दोन ई-निविदा व प्रत्येक तालुक्यातील पाच  ग्रामपंचायतीमधील एक ई-निविदा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत निवड करून चौकशी करण्यात येणार आहे. असा स्पष्ट आदेश देऊन ई-निविदा प्रकरणी प्रत्येक तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांच्या दोन व निवडक ग्रामपंचायतीच्या पाच अशा प्राथमिक स्वरूपाच्या चौकशा गट विकास अधिकारी आणि ग्रामेसवकांच्या सुरू झाल्या आहेत. अशी माहिती अखिल भारीतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

No comments:

Post a Comment

Comments system