🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसच्या वतिने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात चूल मांडून भाकरी करत केंद्र सरकारचा निषेध

श्रीरामपूर(वातार्हर)- आज पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीने सर्वसामान्याचे जिने मुश्किल केले आहे.यावर कोणीही बोलायला तयार नाही आघाडी सरकारच्या काळात भाजपाची सत्ता नसताना भाजपाचे  नेते डोक्यावर गॅस टाकी होऊन आंदोलन करत होते.आता त्यांचे  भाजपाचेच सरकार आले असताना पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीचा भडका झालेला असताना हे पुढारी, नेते मुके प्राणी झाले असल्याचे मत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक  यांनी व्यक्त केले.


        आज राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसच्या वतिने  पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात निषेध म्हणून शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर चूल मांडून भाकरी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा आदिक बोलत होत्या.
याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, तालुकाध्यक्ष पुष्पाताई कवडे, शहर कार्याध्यक्ष सोनल मुथा, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पवार, शहराध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे,सोमनाथ गांगड,कामगार नेते दीपक चव्हाण,विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात,जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे,अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस सोहेल दारुवाला, युवक कार्याध्यक्ष अलत्मश पटेल,जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश डावखर, प्रशांत खंडागळे, नितीन गवारे, भाऊसाहेब वाघ, राजेंद्र पानसरे,डॉ. बापूसाहेब आदिक,अप्पासाहेब आदिक, हंसराज आदिक, शहर उपाध्यक्ष सैफ शेख,योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे, राजेश बोर्डे,भागचंद औताडे, भाऊसाहेब औताडे, वसंतराव पवार,उपाध्यक्ष शफी शहा, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, तौफिक शेख,भैय्या भिसे,अरुण कवडे,शहराध्यक्ष गोपाल वायनदेशकर,अनिरुद्ध भिंगारवाला, शुभम पवार,लक्ष्मण धोत्रे, राहुल बोरावके, रोनीत घोरपडे, विश्वास पटारे,समित मुथा,अभिषेक गुलगड,संग्राम पटारे,प्रसाद चव्हाण, सुनिल म्हस्के, स्वप्निल जाधव, सुधाकर आढगळे, सोहेब शेख, मुश्ताक शेख,उदय साबळे,रयन काले,कैवल्य लावंड,गणेश शिंदेआदि युवक उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार अशोक उगले यांना निवेदन देण्यात आले.



पुढे बोलताना नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या कि केद्रातील भाजपा सरकारने मागील ५ वर्षात ४४ वेळा पेट्रोल डिझेलचे  दरवाढ केली आहे .यावर केद्राचे अर्थमंत्री म्हणतात कि केद्र व राज्य सरकारने एकत्र चर्चा करुन सेंट्रल टॅक्स व स्टेट टॅक्स यामध्ये कसे कमी करता येईल यावर चर्चा केली पाहिजे मात्र केद्र सरकार चर्चा करायलाच तयार नाही.कोरोना काळात देश व  राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना केद्रातील भाजपा सरकार मात्र दररोज पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरात वाढ करत आहे.या दरवाढिने युवक,व्यापारी सह सर्वाना प्रवास करणे महाग झाले आहे मार्केटची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.याकडे केंद्र  सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही.आता सरकारने या महागाईकडे लक्ष घालून तात्काळ पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ कमी करावी अशी मागणी त्यांनी केली.

   यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार व सुरेखाताई कासार  यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Comments system