Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

नगर परिषदेचे कामकाज अतिशय पारदर्शी व चांगले असून नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यात चांगला समन्वय आहे , नगरपरिषद प्रशासन संचालक डॉ किरण कुलकर्णी

श्रीरामपूर( वातार्हर)-येथील नगर परिषदेचे कामकाज अतिशय पारदर्शी व चांगले असून नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यात चांगला समन्वय आहे त्यामुळे या पालिकेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन  नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक तथा राज्याचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
 नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक तथा राज्याचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी
व उपायुक्त श्रीकांत अनारसे हे ,श्रीरामपूर नगरपालिकेच्या कामकाज तसेच कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी, २४ व २५ ऑक्टोबर रोजी दौऱ्यावर आलेले असतांना. पालिकेच्या प्रशासनातील अधिकारी व कर्माचा-यांशी, संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, राहूरीचे प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप ,मुख्याधिकारी गणेश शिंदे,नगरसेवक राजेंद्र पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अलत्मश पटेल सोमनाथ गांगडआदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना डॉ कुलकर्णी म्हणाले माझे व अनारसे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथेच झालेले असल्यामुळे आम्हाला माहेरी आल्यासारखे वाटते, माझे वडील हरिभाऊ कुलकर्णी हे याठिकाणी ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते त्यांच्या नावाने येथे हरिभाऊ कुलकर्णी अभ्यासिका चालू आहे.
पालिकेच्या माध्यमातून कशारितेने प्रस्ताव सादर करावा, विविध शासकीय योजनांच्या निधींचा विनोयोग कशा प्रकारे करण्यात आला. विविध विभागात कशा पध्द्तीने काम चालते, कामाची पद्धत व पारदर्शकता कशा प्रकारे आणावी, त्याच बरोबर इतिवृत्त लेखनातील चौक्यांमुळे शासनाकडे पाठवलेले प्रस्ताव मागे येणार नाही याची दक्षता घ्यावी, नवीन प्रस्तव प्रलंबित मागण्या ,पुढील नियोजित निधी यांचा समन्वय साधून, पारदर्शक काम करण्याचे आदेश , नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे राज्याचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांनी, पालिकेच्या अधिकारी व कर्माचा-यांना आदेश दिले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी,पालिकेच्या प्रलंबित प्रस्तावबाबत चर्चाकरून लवकरात लवकर ते मार्गी लावावेत अशी मागणी केली.पालिकेच्या कामकाजा दरम्यान प्रशासनास येणाऱ्या अडचणी, व विविध समस्यां संदर्भात कशा प्रकारे निर्णय घ्यावे याबाबत सविस्तर चर्च केली, सदरच्या आढावा बैठकी नंतर, आयुक्त डॉ किरण कुलकर्णी व उपायुक्त श्रीकांत अनारसे यांनी पालिकेतील विविध विभागाची पाहणी करून. पालिकेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले तर आभार नगरसेवक राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान आढावा बैठक संपल्यावर डॉ. किरण कुलकर्णी व
उपायुक्त श्रीकांत अनारसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्याशी विविध विकास कामांबाबत चर्चा केली व नगराध्यक्षा अनुराधताई आदिक या नेहमीच पालिकेच्या कामासंदर्भात संपर्कात राहतात त्यांची काम करण्याची पध्दत अतिशय चांगली असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात