Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

गरजवंताना वह्यांचे वितरण



अहमदनगर (प्रतिनिधी)=आज 'एक हात मदतीचा' या जीवन गौरव शैक्षणिक मासिकातर्फे राज्यभर राबविण्यात असलेल्या उपक्रमात शिरापूर ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील  शेतकरी , कष्टकरी मजुरांच्या आर्थिकदृष्ट्या वंचित घटक   समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्यचे मुख्य संपादक मा. रामदासजी वाघमारे साहेब,व प्रमुख पाहुणे म्हणून  अहमदनगर येथील प्रसिद्ध अभियंता नानासाहेब जिवडे , व  पंचप्राण ट्रेकिंग समूह प्रमुख विजय विरकर , प्रा. गिते सर,प्रा. सांगळे सर   , शाळेचे मुख्याध्यापिक विश्वास बुधवंत सर , शालेय समितीचे सदस्य दिलीप बुधवंत, बाळासाहेब पोपळभट ,आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात  जीवन गौरव मासिक साहित्यकला लेखक वाचक मंचाच्यावतीने मान्यवरांचा जीवन गौरव मासिक ,शाल व पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपयुक्त शालेय साहित्य , आणि खाऊ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंपादक देविदास बुधवंत यांनी केले. मा.वाघमारे सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विश्वास बुधवंत सर  यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक डॉ. अशोक डोळस,व रज्जाक शेख यांनी मेहनत घेतली.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात