श्रीरामपूर ( वातार्हर)- : येथील जिजामाता तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदोत्सव साजरा करण्याची प्रथा कायम ठेवली असुन शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते घटस्थापना व देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, शिर्डी संस्थांचे विश्वस्त सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा दीपालीताई ससाणे, समता उद्योग समूहाच्या संचालिका स्वाती कोकाटे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय छल्लारे उपस्थित होते.
गेली 33 वर्ष या मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक मान्यवर व्यक्तींना देण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक वैद्यकीय, राजकीय, सामाजिकल, पत्रकारिता क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मान्यवर समावेश आहे. याच व्यक्तींना पुजेचा मान देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु यावर्षी कोरोना काळात ज्यांनी आपले प्राणपणाला लावून कोरोना रुग्णांची मनोभावे सेवा केली व त्यांना जीवदान दिले. अशा कोरोना योद्ध्यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात येणार आहे यामध्ये स्मशानभूमीमध्ये चोवीस तास कार्यरत असणारे स्मशानजोगी, शहर व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, रुग्णवाहिकेचे चालक व कोरोना काळात करोना रुग्णांची सेवा करणारे समाजबांधव यांना यावर्षीचा पुजेचा मान देण्यात आला आहे.
जिजामाता तरुण मंडळाने गेल्या 33 वर्षात समाजातील उपेक्षितांना, वंचित, शैक्षणिक, वैद्यकीय, होतकरू विद्यार्थ्यांना कोरोना संकटात आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच समजात प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून समजाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. नेहमीच शहरात वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मान्यवर संस्थानी मंडळाला पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटात मंडळाचे सदस्य तत्परतेने उभे आहे. शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी सहकार्य केल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असे संजय छल्लारे यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश कुलथे, राजेंद्र भांबारे, सुहास परदेशी, शरद गवारे, लोकेश नागर, देवेन पीडीयार, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर - येथील जिजामाता तरुण मंडळाच्या ३४ व्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापना करण्यात आली. यावेळी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, समता उद्योग समूहाच्या संचालिका स्वाती कोकाटे, दिपालीताई ससाणे, मंडळाचे अध्यक्ष संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे
No comments:
Post a Comment