🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

किसान कनेक्टच्या मॉम्स किचनचे दिपावलीचे फराळाचे खाद्यपदार्थ केंद्रचे शुभारंभ


श्रीरामपूर(वार्ताहर)-निर्मळ उद्योग समुहाचे किसान कनेक्टच्या मॉम्स किचनचे दिपावलीचे फराळाचे खाद्यपदार्थ व पारंपारिक मिठाई केंद्र श्रीरामपूरात दोन ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ पत्रकारांच्या उपस्थित करण्यात आला.
निर्मळ उद्योग समुह किसान कनेक्टच्या माध्यमातुन शेतकèयांसाठी विविध प्रकारचे शेती लागणारे साहित्य तसेच जनवारासाठी खाद्य पुरवण्याचे व्यापक काम सुरु आहे. त्यांचबरोबर गेल्या काही दिवसापुर्वी महिलाच्यामाध्यमातुन मॉम्स किचन सुरु करण्यात आल्यामुळे अनेक महिलाना रोजगार उपलब्ध झाला आहे.या मॉम्स किचनव्दारे तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे खाद्य  पदार्थ मुबंई, पुणे यासारख्या शहरात पाठवले जात आहे. दिपावलीचे औचित्य साधुन मॉम्स किचनने शहरातील गिरमे चौक व महाले ज्वेलर्स मेनरोड याठिकाणी विक्री केंद्र सुरु केले आहेत. गिरमे चौकातील केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी किसान कनक्टेचे अनिकेत किशोर निर्मळ, पत्रकार सर्वश्री,बाळासाहेब भांड, अनिल पांडे, राजेद्र बोरसे,नवनाथ कुताळ, गौरव सांळुके, सुरेश कांगुणे, प्रकाश कुलथे, महेश माळवे,मयुर पांडे तसेच सिध्दार्थ गिरमे,विशाल वधार्व आदि उपस्थित होते.
या मॉम्स किचनमध्ये तयार करण्यात आलेले. विविध प्रकारचे लाडु, करंजी, चकली, अनारसे,शेव,तसेच अनेक चविष्ट खाद्यापदार्थाचा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. सदर वस्तु खरेदीसाठी ग्राहक येत असल्याचे अनिकेत निर्मळ यांनी सांगितले.  

श्रीरामपूर-गिरमे चौक येथे निर्मळ उद्योग समुहाचे किसान कनेक्टच्या मॉम्स किचनचे दिपावलीचे फराळाचे खाद्यपदार्थ व पारंपारिक मिठाई केंद्राचा शुभारंभप्रसंगी पत्रकार व किसान कनेक्टचे अनिकेत किशोर निर्मळ

No comments:

Post a Comment

Comments system