🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

दिवाळी अंकांना प्रतिसाद वाढला, मयुर पांडे

श्रीरामपूर(वार्ताहर) - दिवाळी आणि दिवाळी अंक हे समीकरण आहे. या आंनदाच्या उत्सवात विविध प्रकारचे रुचकर फराळाला जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व दिवाळी अंकाना प्राप्त झाले आहे. यावर्षी २२५ ते २५० अंक वाचकाच्या भेटीला आले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक मयुर विजय पांडे यांनी दिली.
आता साहित्य व वाचन प्रेमीसाठी मोठ्या प्रमाणात दिवाळी अंक बाजारात आले आहे.त्यामुळे यंदाची दिवाळी या शब्द फराळाने आधिक रुचकर होणार आहे.असे मयुर पांडे यांनी सांगितले.
करोनामुळे मागील वर्षी दिवाळी अंकाची संख्या घटली होती. लोकडाऊनमुळे सर्व गोष्टीवर मर्यादा होत्या. दिवाळी अंकाचा आनंद मनसोक्त लुटता आला नव्हता. यावर्षी वाचकाना आधिक-आधिक अंकातुन मागील वर्षीच्या वाचनाची ताण भागवता येणार आहे. दिवाळी दोन दिवसावर आली आहे.त्यामुळे बाजारात दिवाळी अंकाची संख्याही वाढत आहे.
करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी काही अंक प्रकाशीत झाले नव्हते मात्र यावेळी करोना अटोक्यात आहे. तसेच दिवाळी सणानिमित्त उत्साह आणि आंनदाचे वातावरण आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रकाशीत न झालेले पोलिस टाईम्स, कथाश्री, नवरंगरुपेरी धनुर्धारी आदि अंक प्रकाशीत झाले आहे. त्यामुळे दिवाळी अंकाची संख्या वाढली आहे. करोनामुळे अनेकानी दिवाळी अंक प्रकाशीत केले नव्हते मात्र यावेळी जुने आणि नवीन मिळुन असे अंक प्रकाशीत झाले आहे.
  दिवाळी अंकाचा प्रवास यावर्षी ११४ वे वर्षात प्रदापन करत आहे. वाचक प्रिय, बुध्दवंताची वैचारीक समृध्दी वाढवण्यसाठी भुक भागवण्याचे काम होते ते दिवाळी अंकाने. मराठी वाड्मयीन विश्वात तर दिवाळी अंकानी साहित्यीकाच्या अनेक पिढ्या घडवल्या. अशा दिवाळी अंकाचा प्रवास ११४ वर्षचा होत आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन हजार अंक दरवर्षी प्रकाशीत होतात.  ई- दिवाळी अंकाना ही मागणी वाढत आहे.असे प्रकारचे २२५ ते २५० प्रकारचे दिवाळी अंक बाजारात दाखल झाले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक मयुर विजय पांडे , मिथुन किशोर पांडे यांनी दिली.
  दिवाळी अंक नेहमिच मराठी वाचकांच्या कक्षात रुंदावणारे ठरले आहे. येथील साहित्य हे तत्कालिन प्रगल्भ चळवळीतून नेहमिच समोर येत राहिले. दिवाळी अंकांनी
हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आरोग्य, ज्योतिष्य, रहस्यकथा, चित्रपट, पर्यटन,अध्यात्मिक, पापपूर्ती आदी विविध विषयांना वाहलेले एवढेच नव्हे तर विद्यर्थी, मुले,
कामगार, कष्टकरी असे कोणत्याही स्तरातील स्वतंत्र अंक प्रकाशित होऊ लागले आहे. ललित साहित्य, वैचारिक आणि पुरोगामी साहित्याच्या अंकांपेक्षाही आरोग्य,
ज्योतिष्य आणि आध्यात्मिक विषयाच्या दिवाळी अंकांचा खप दरवर्षी वाढत असल्याचे मयुर पांडे यांनी सांगितले.
दैनिकांमधिल लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकमतचादिपोत्सव, केसरी, सामना, पुढारी याच बरोबर साप्ताहिक साहित्यामध्ये
 चित्रलेखा, लोकप्रभा यांची दिवाळी अंकांत वेगवेगळया विषयांची मांडणी केली आहे. शेतीविषयक अ‍ॅग्रोवन, उद्योजक यांचे दिवाळी अंक बाजारात आले आहे.
विनोदी अंकांचा बादशाह आवाज, जत्रा,धमाल धमाका,फिरकी,शामसुंदर हे अंकंही आले आहेत. तसेच आरोग्यासाठी घरचा वैद्य, डायबेटीज मित्र हे अंकही आले आहेत. प्रकाश कुलथे यांचा विनोदी अंक वल्र्ड सामना तसेच सुमती लांडे यांचे शब्दालय प्रकाशन यांनाही मागणी चांगली आहे.नरेद्र लचके यांचा शितल टाईम्स ,संगमनेरचे किसन हंसे यांचा युवावार्त या अंकासह  सर्व प्रकारचे दिवाळी अंक पांडे बंधु यांच्या स्टॉलवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

श्रीरामपूर- येथील वृत्तपत्र विक्रेता मयुर पांडे यांच्या स्टॉलवर विविध दिवाळी अंक दिसत आहे

No comments:

Post a Comment

Comments system