Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

भि.रा. खटोड कन्या विद्यालयाचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न


श्रीरामपूर(वातार्हर)- जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेसाठी योगदान दिलेल्या ,झटलेल्या, वेगवेगळ्या कर्मयोगी, दानशूर, कर्तव्यदक्ष, समाजसेवी व शिक्षण प्रेमी व्यक्तीचा नामोल्लेख करून त्यांच्या कामाची आठवणी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी उजाळा दिला.
    ९ नोव्हेंबर २०२१रोजी हिंद सेवा मंडळाची बालिका म्हणजेच भि. रा.खटोड कन्या विद्यालय  ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये  हिंद सेवा मंडळाचे सहसचिव व विद्यालयाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये हे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक नाना क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी क. जै.सोमैया हायस्कूल चे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, क. जे. सोमैया ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष चंद्रकांत सगम, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे , अरुण धर्माधिकारी,संजय साळवे, श्रीम. सुजाता मालपाठक, सेवक प्रतिनिधी नवनाथ जंगले उपस्थित होते. 
        तसेच हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी व जुनिअर कॉलेज चे. रणजीत श्री गोड यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. 
         विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  विजया तागड व पर्यवेक्षिका सौ. मंगला डोळस यांनी शुभेच्छा दिल्या. 
        विद्यालयाच्या पर्यवेक्षिका  विद्या कुलकर्णी यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत आजी-माजी मुख्याध्यापक व अध्यक्ष यांचा नामोल्लेख करून त्यांच्या काळामध्ये विद्यालयाची केलेली भरभराट यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार  अनिल जगताप सर यांनी मानले.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात