Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्हा कडवा पाटीदार समाजाच्या अध्यक्ष पदी प्रसिद्ध उद्योजक नारायणभाई पटेल यांची निवड


श्रीरामपूर(वातार्हर)- अहमदनगर जिल्हा कडवा पाटीदार समाजाच्या अध्यक्ष पदी प्रसिद्ध उद्योजक नारायणभाई पटेल यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड सन 2021 ते 2024 पर्यत आहे. राहुरी येथे पांडुरंग मंगल कार्यालयात समाजाच्या बैठकित करण्यात आली.
 उपाध्यक्ष पदी  मनोहर हळपाणी(राहुरी)मंत्री पदी जेठलाल दिवाणी(कोपरंगाव), खजिनदार पदी चिमनभाई चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. 
    अध्यक्ष पदी निवड झालेले नारायण भाई पटेल हे श्रीरामपूरचे प्रसिद्ध उद्योजक आहे. गेल्या 70 वर्षेपासून कार्यरत असलेल्या आसापुरा सॉ मिल-टिम्बर व आसापुरा स्टील चे संचालक असून 15 वर्षेपासून श्रीरामपूर च्या गुजराती समाजाचे अध्यक्ष आहे ,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आहे, तर रोटरी एज्युकेशन ट्रस्ट चे माजी अध्यक्ष आहे, सामाजिक कार्याची त्यांना आवड असून विविध प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबीर, रोग निदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उन्हाळ्यात चालवण्यात येणाऱ्या जनावरांच्या छावण्याना चारा पुरवतात.  मूकबधिर अपंग यांच्या विवाह साठी प्रयत्नशील असतात. तसेच कोरोना महामारीत आर्थिक मदत प्रमुख्याने केली आहे. 
     समाजा बांधवाचा स्नेहमिलन  राहुरी येथे आयोजित करण्यात आलेला होता . बहुसंख्य सभासद बंधुभगिनी उपस्थित राहून खेळीमेळीचे वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. नूतन अध्यक्ष नारायण भाई पटेल यांचे  निवडी बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात