श्रीरामपूर (वार्ताहर) : भारत संचार निगमच्या संचालकपदी निवड राष्ट्रपती रामनाथ कोqवद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही निवड राजकीय नसल्याचे नूतन संचालक व ज्योती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. रविकाका बोरावके यांनी स्पष्ट केले.
येथील रविकाका बोरावके मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, शिवसेनेचे नेते अशोक थोरे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, भारत प्रिंट्सचे I संचालक प्रशांत पाटणी, महावीर पाटणी, पत्रकार अनिल पांडे यांच्यासह संजय आगाशे, महावीर काला, महर्षी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे आदी उपस्थित होते.
बोरावके म्हणाले, भारतीय जनता पक्षात आजपर्यंत अनेक पदांवर काम केले. ज्योती नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे केली. देशभरातून भारत संचार निगमचे चार संचालक घेतले जातात. त्यात माझी निवड करण्यात आली आहे. या कंपनी २००४ पर्यंत खूप नुकसान झाले. ही कंपनी बंद पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, केंद्र सरकारने यात आता लक्ष घातल्याने ही कंपनी पुन्हा उर्जितावस्थेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ससाणे, गुजर, थोरे, बिहाणी, छल्लारे आदींची भाषणे झाली. दिगंबर जैन समाजाच्या कचनेर येथील संस्थानवर निवड झालेले महावीर पाटणी व महावीर काला यांच्यासह भाजपचे उत्तर नगरचे जैन प्रतोद म्हणून निवड झालेले नितीन ललवाणी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले. स्वागत प्रशांत आर. पाटणी यांनी केले. भाजपचे मारूती qबगले, गणेश राठी, राजाभाऊ पाटणी,ज्योती पतसंस्था चे श्रीरामपूर चे मॅनेजर बाबुराव राधवणे,अशोक सोनी, डॉ. जयप्रकाश गंगवाल, कल्याण कुंकूलोळ, अनुप लोढा, सुभाष पानसरे, गुलाबचंद झांजरी, नंदलाल पापडीवाल, अजय चुडीवाल, सुरेश झांजरी, वीरसेवा दलचे अध्यक्ष प्रितम पांडे, पारस पाटणी, डॉ. सुशिल गंगवाल, सुरेंद्र ससाणे,ताहीर बागवान, पलाश पाटणी,दर्शन पाटणी, राजेंद्र पाटणी आदी उपस्थित होते. आभार अनिल पांडे यांनी मानले.
श्रीरामपूर- येथील रविकाका बोरावके मित्रमंडळाच्या वतीने भारत संचार निगमच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अॅड.रविकाका बोरावके यांचा मानपत्र देवून सन्मान करताना उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, सचिन गुजर, अशोक थोरे, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, संजय छल्लारे, प्रशांत पाटणी, अनिल पांडे ,संजय कासलिवाल आदि.(छाया-मयुर पांडे)
No comments:
Post a Comment