Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

भाऊबीजेच्या सणाला


भाऊबीजेच्या सणाला

किती येतो सकाळीच
आठवनीत देवराया
मज माहेरा नेण्या दे
पाठवून भाऊराया...!!

काक झाडावरी
करी कावकाव
तुला भेटाया होई
जीवाची धावाधाव...!!

ओवाळून गोंजारते
अक्षदा डोई पडो
भाऊरायाची भेट
वाटे रोज रोज घडो....!!

औक्षण करते लावून
गंध टिळा कपाळी
रक्षण करण्या माझे
बंधन जोडते सकाळी...!!

नाते जन्मोजन्मी पावले
बहीणीचा भाऊ पाठीराखा
आई बापागत धाव मनाने
जेव्हा प्रसंग येईल बाका..!!

नाही आस चोळी लुगड्याची 
गोडी लाभूदे नात्याची
येताजाता विचारपूस कर
तुझ्या छोट्या भाचीभाच्याची...!!

तुला पहाताच नयनी
अश्रू  होतात  गोळा
राखीपोर्णीमा पंचमीच्या
आठवणींचा भरे पोळा....!!

आला नेण्यासाठी मला
जरा   माहेरा   जाते
किती  कष्टते  परी
गोडवे सासराचे गाते....!!

आज भाऊबीज आली
आनंद भरला मनात
गोतावळा भेटे माहेरी
दिपावलीच्या सणात...!!

                                             कवी 
                              श्री.रज्जाक शेख, श्रीरामपूर
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात