पुणे येथे बाळासाहेब ठाकरेंच्या चित्र, अर्कचित्र प्रदर्शन
चित्रकार रवी भागवत यांच्या तीन चित्रांची निवड
श्रीरामपूर-
महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपच्या ‘कार्टून्स कट्टा’च्यावतीनेहिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठीचित्र व अर्कचित्रांचे ‘आमचेही फटकारे’ हे प्रदर्शन पुणे येथीलबालगंधर्व कलादालनात सुरू होत आहे. निवड समितीनेयेथील चित्रकार रवी भागवत याच्या तीन चित्रांची निवड याप्रदर्शनासाठी केली असल्याची माहिती संयोजक चित्रकारघनश्याम देशमुख यांनी दिली आहे.
देशभरातील शंभरहून अधिक चित्रकार वव्यंगचित्रकारांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनास बुधवार दि. १७ पासूनसुरू होत असून तीन दिवस दररोज सकाळी ११ तेरात्री ८ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. देशभरातील ज्येष्ठ व तरूण चित्रकार व व्यंगचित्रकारांनीआपापल्या चित्र शैलीतून शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटून त्यांनामानवंदना दिली आहे. तीन दिवस निमंत्रित चित्रकार आपल्याफटकाऱ्यांतून रसिकांसमोर प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
वासुदेव कामथ, राज ठाकरे, प्रमोद कांबळे, बिजय बिस्वाल, घनश्याम देशमुख आदी मान्यवर चित्रकारांसह येथीलचित्रकार रवी भागवत यांच्या तीन चित्रांची निवड याप्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. भागवत यांनी त्यांचे गुरूचित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटलमाध्यमात बाळासाहेब ठाकरे यांची १२ इंच बाय १८ इंचआकाराची तीन चित्रे साकारली आहेत. ठाकरे यांच्या वयातीलतीन ट्टप्यांतील चित्रे भागवत यांनी साकारली आहेत.
No comments:
Post a Comment