कृषी संस्कृती चे जतन करण्यासाठी
अखिल भारतीय छावाचा कारेगावत बळीराजा मोहत्सव
श्रीरामपूर-कृषी संस्कृती चे जतन करण्यासाठी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कारेगाव येथे बळीराजा पूजन करून अखिलभारतीय छावा च्या वतीनेदरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘बळीराजा मोहत्सव’साजरा करण्यात आला.
काशीनाथ तऱ्हाळ यांच्याहस्ते पूजन करून अशोक चे माजी संचालक साहेबराव पटारे यांनी बळीराजा प्रतिमेला पुष्पहारअर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी अबकरी कर निरीक्षक (एक्ससाईज इन्स्पेक्टर) आण्णासाहेब बोरुडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते.
जिल्हाध्यक्ष पटारे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती शी निगडित असून प्रत्येक सण हा कृषी संस्कृतीच्या आधारे येतो घटस्थापना म्हणजे शेतकऱ्यांची बियाणे ची उगवण क्षमता तपासणी चाचणी आहे. दिवाळी सनाला दिवे लाण्यामागे शास्त्रीय कारण आहे. असंख्य दिवे लावल्याने त्याकडे पतंग हा किटक आकर्षित होऊन त्याचा नाश होतो. त्यामुळे किडीची पिढी वाढत नाही आणि जैविक कीड नियंत्रण होते.शेतकऱ्यांचा राजा सम्राट बळीराजा याचा विष्णू ने वामन अवतार घेऊन पाताळात ढकलला. तो बळीराजा बळीप्रतिपदेला म्हणजे दिवाळी पाडव्याला शेतकऱ्यांना भेटायला येतो त्यादिवशी शेतकरी खरिपात पिकवलेलं धान्य चे पूजन करून त्या धन्याची देवाण घेवाण करून दैनंदिन व्यवहार करतात आणि आपला उदार निर्वाह चालवतात.
पण सनातनी त्याला अनिष्ट रूढी परंपरेचा मुलामा देऊन पूजा पाठ करून धार्मिक गुलामगिरी त शेतकऱ्यांना अडकीवीत आहेत.सुशिक्षित तरुण उच्च शिक्षण घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी धार्मिक गुलामगिरी झुगारून कृषी संस्कृतीचे जतन केले तर शेतकऱ्यांची नक्कीच प्रगती होईल. यावेळी तालुका सरचिटणीस प्रशांत पटारे, शाखाध्यक्ष गोवर्धन गोरे, संघटक अक्षय पटारे, वि आ चे प्रदीप पटारे, सचिव राजू गुंजाळ, उपाध्यक्ष राहुल तारक, जिल्हा मार्गदर्शक बहिरनाथ गोरे, अक्षय बोरुडे, मयूर पटारे, गोरख उंडे, प्रफुल्ल पटारे,रोहन पटारे, विशाल भापकर, दत्तात्रय ठोकळ,सकाहरी भवार, दिलीप कहानडळ, ज्ञानेश्वर पटारे, सकाहरी भवार, पोपट भिंगारे, बाळासाहेब उंडे, संचालक ऍड दत्तात्रय पटारे, विठ्ठल गोरे,जालिंदर खैरे, माजी संचालक मारुती पटारे,अशोक लवांडे, राजू भिंगारे, हरिभाऊ पटारे, प्रा.रमेश पटारे, पोपट भिंगारे, सुभाष कैठले, राजू डोळस, माजी चेरमन लक्ष्मण भवार, संचालक भाऊसाहेब उंडे, वसंत नागुडे, नंदकुमार पाटील पटारे, नानासाहेब लवांडे, गीतराम नागुडे,रामदास कौठाळे, पोपट भवार, प्रमोद उंडे,भास्कर बारसे, छगन गोरे, सरपंच आनंद वाघ,सदस्य सुनील पटारे, प्रणव भारत, जालिंदर उंडे,कैलास पाटील, सोसा संचालक सचिन दांडगे,नाना गोरे, सुधीर खपके, योगेश पटारे,जाधव सर, अनिल वाघ, जितेंद्र पटारे, वसंतराव उंडे,हरिभाऊ उंडे आदी उपस्तीत होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्कर्ष पटारे,रामेश्वर जाधव, अशोक शेळके,मंदिराचे पुजारी राम बैरागी, प्रशांत पटारे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment