Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

गणेश राठी यांचा सहकार पॅनलला पाठिंबा


गणेश राठी यांचा सहकार पॅनलला पाठिंबा

श्रीरामपूर-नगर अर्बन बँकेच्या २८ रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उमेदवार गणेश राठी यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे राहिला आहे.  त्यामुळे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपला पाठिंबा कै. दिलीप गांधी प्रेरीत सहकार पॅनलला देत असल्याचे जाहीर केले.

       रविवारी दि. २८ रोजी नगर अर्बन बँकेची संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी शाखा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणेश राठी यांनी अर्ज भरला आहे. तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज राहिला आहे. मात्र आपण कै. खा. दिलीप गांधी यांना मानणारे असून त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या सहकार पॅनलला आपण जाहीर पाठींबा देत असल्याने त्यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे जाहीर केले आहे. मतदारांनी सहकार पॅनलला मतदान करून निवडूण द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

 


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात