भारतीय जनता पार्टीच्यावतीने दिवाळी स्नेहमिलन (फराळ) संपन्न
श्रीरामपूर-
श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन अर्थात दिवाळी फराळ समारंभास शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे, भाजपाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा संयोजक राजेश शर्मा, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
संगमनेर रोड वरील राठी ॲटो येथील प्रांगणात सचिन भैरवकर, जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा सचिव अनिल भनगडे या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपसथितीत या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या पाहुण्यांचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, सरचिटणीस अजित बाबेल, रवी पंडीत, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय वर्पे, तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, यांनी स्वागत केले.
समारंभास माजी सभापती दिपक पटारे, राधाकृष्ण आहेर, नंदकिशोर राठी, गणेश मुदगुले, सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेवक दिपक चव्हाण, राजेश अलघ, दिलीप नागरे, नगरसेविका वैशाली चव्हाण, केतन खोरे, रमन मुथ्था, सुनील बोलके, सचिन बडदे, बाबा शिंदे, बोबडे, लकी सेठी, राकेश न्याती, ओम महाले, तनिष पाटणी, तिर्थराज नवले, करण नागरे, अंकित आहुजा, यश पटेल, अभिषेक मार्शिया, तुषार सोनी, संयम थेटे, प्रथम ठक्कर, सर्वेश राठी, आशिष राठी, मंडलिक, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, कचनेर देवस्थानचे विश्वस्त महावीर काले, श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे वैभव लोढा, अमोल कोलते, उमेश अग्रवाल, नितीन ललवानी, राजेंद्र कोठारी, मुकेश कोठारी, संजय कोठारी, गोपाल मांडण, विकी कथुरिया, बंटी गुरूवाडा, जगदीश भावसार, बिंद्रा, देवीदास चव्हाण, विजय ढोले, राजू राठी, अशोक राठी आदींनी हजेरी लावली.
समारंभाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सचिव अक्षय नागरे, अमोल अंबिलवादे, तेजस पाथरकर, श्रेयस झिरंगे, अमोल शिंदे, स्त्रजल त्रिवेदी, प्रविण पंडित, राहुल आठवल, गौरव भागवत, हंसराज बतरा, साजिद शेख, सल्लाऊद्दीन शेख, विजय आखाडे, गणेश अभंग, औद्योगिक आघाडीचे सुनील चंदन, सांस्कृतिक आघाडीचे बंडू शिंदे यांनी प्रयत्न केले.
यावेळी आभार महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन व सहकार आघाडीचे संयोजक राजेश राठी यांनी मानले.
No comments:
Post a Comment