🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

इनरव्हिल क्लबने सामाजीक, शैक्षणिक कार्यचा ठसा उठवला, प्रातपाल संतोषजी सिंग

श्रीरामपूर(वार्ताहर)-श्रीरामपूर इनरव्हिल क्लबने नगरपालिकेची शाळा दत्तक घेऊन आपल्या सामाजीक, शैक्षणिक कार्यचा ठसा उठवला असल्याचे प्रतिपादन इनरव्हिल क्लबच्या प्रातपाल संतोषजी सिंग यांनी केले आहे.
    इनरव्हिल क्लब प्रांतपाल संतोषजी सिंग यांनी क्लबला भेट दिली यावेळी क्लबच्यावतीने केली जात असलेली सामाजिक कामे बघुन त्या भारावुन गेल्या.यावेळी क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता,रतन देशमुख, श्वेता शहा,प्रिया अग्रवाल, सुरेखा दंड,डॉ.ज्योत्सना तांबे,प्रिया शहा,कल्पना बनकर, सुनिता धुमाळ,मंगला अढाव,सुजता शेंडगे यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
येथील इनरव्हिल क्लब श्रीरामपूरला प्रांतपाल संतोषजी सिंग यांनी भेट दिली.  यावेळी प्रांतपाल संतोषजी सिंग म्हणाले, इनरव्हिल क्लब श्रीरामपूरचे काम चांगले चालु आहे.माजी अध्यक्षा प्रिया अग्रवाल यांनी क्लबला संजिवनी दिली.आता क्लब चांगले कार्यकरत आहे. क्लबच्यावतीने शाळा दत्तक घेण्यात आली. शहरातील छोटया व्यवसायीकाना आर्थिक मदत करण्यात येते.कोव्हिडच्या काळात हि चांगले काम केले हा क्लब सर्वसामान्यना आपलासा वाटावा असे कार्य करत आहे. यांचा आपणास अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या.
क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता यांनी क्लब करत असलेल्या कार्यची माहिती दिली.यावर्षी क्लबने राबवलेल्या दिपावली खरेदी महोत्सवला मोठा प्रतिसाद मिळाला. क्लबच्या सदस्याचे प्रत्येक कार्यस सहभाग असतो. 
    अंध शाळेला शालेय साहित्य इनरव्हील क्लबच्या वतीने देण्यात आले. यावेळी रतन देशमुख यांनी प्रास्ताविक केले  प्रिया शाह यांनी आभार मानले.प्रिया अग्रवाल यांनी सुत्रसचलन केले.तसेच क्लबच्यावतीने राबविण्यात येणाèया विविध उपक्रमाचे माहिती दिली.



श्रीरामपूर- इनरव्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने आयोजीत कार्यक्रमाप्रंसगी दिपप्रज्वलन करताना प्रांतपाल संतोषजी सिंग समवेत अध्यक्षा ममता गुप्ता,रतन देशमुख, श्वेता शहा,प्रिया अग्रवाल, सुरेखा दंड,डॉ.ज्योत्सना तांबे,प्रिया शहा,कल्पना बनकर, सुनिता धुमाळ,मंगला आढाव,सुजता शेंडगे .(छाया-अनिल पांडे)

No comments:

Post a Comment

Comments system