इनर व्हिल क्लब श्रीरामपूर च्यावतीने श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील मुलांना वॉशिंग मशीन ,जेवनाचे डब्बे भेट
इनर व्हिल क्लब च्या माजी अध्यक्ष प्रिया अग्रवाल यांच्या पुढाकारातून क्लब च्या अध्यक्ष ममता गुप्ता यांच्या सहकार्यातून या भेट वस्तू आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर आढाव ,निकता आढाव यांनी स्वीकारले यावेळी क्लब च्या रुपाली शहा, श्वेता शहा, शीतल गुप्ता, ममता गुप्ता, कल्पना बनकर, सुजता शेडगे, रमा फोपळे, प्रिया अग्रवाल, ज्योत्स्ना तांबे, सुनीता धुमाळ, त्रिशला शहा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी अध्यक्ष प्रिया अग्रवाल म्हणले की शहरा पासून दोन किलोमीटर अंतरावर अनाथ मुलाचा आश्रम चालवला जातो आम्ही स्वतः येवून याठिकाणी आश्रमाची माहिती घेतली मुलाशी हितगुज केले. कृष्णानंद महाराज चांगल्या पद्धतीने हा आश्रम चालवत आहे आश्रमात लहान मुले आहे त्याचा चांगला पध्दतीने सांभाळ करून त्याचे शिक्षण ही केले जाते हे बघून आम्हला समाधान वाटले.
क्लब च्या अध्यक्ष ममता गुप्ता म्हणले, हा अनाथ आश्रम बघून भारावून गेलो क्लब च्या सर्व सदस्यांना याची माहिती दिली. कृष्णानंद महाराज यांच्याशी चर्चा करून वॉशिंग मशीन ,जेवनाचे डब्बे ,पाण्याची बाटली व एक लोखंडी कपाट भेट दिले व प्रिया अग्रवाल यांचा वाढदिवस या मुला मध्ये साजरा केला. या आश्रम क्लब च्या माध्यमातून भविष्यात ही सहकार्य करून असा त्या म्हणले.
आश्रमचे अध्यक्ष कृष्णानंद महाराज म्हणले मी स्वतः अनाथ आहे,अनाथांचा वेदना आपण जाणतो अनाथांसाठी आश्रम उघडायचे आपण ठरवले होते शहरा लगत गोखले वाडी परिसरात एका दानशूर च्या मदतीने जागा मिळाली. आश्रमात 14 मुले आहे यांचे पालन पोषण आणि शिक्षण दानशूर च्या मदतीने होत आहे इनर व्हील क्लब ने दिलेला मदतीचा हात आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
श्रीरामपूर-इनर व्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील मुलांना वॉशिंग मशीन ,जेवनाचे डब्बे ,पाण्याची बाटली व एक लोखंडी कपाट भेट कृष्णानंद महाराज यांच्याकडे देण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्ष ममता गुप्ता, रुपाली शहा, श्वेता शहा, शीतल गुप्ता, कल्पना बनकर, सुजता शेडगे, रमा फोपळे, प्रिया अग्रवाल, ज्योत्स्ना तांबे, सुनीता धुमाळ, त्रिशला शहा आदी.(छाया-अनिल पांडे)
No comments:
Post a Comment