शिरसगावातून तरूण बेपत्ता
श्रीरामपूर-
तालुक्यातील शिरसगाव येथील सतिश उर्फ नंदकुमार काळू गायकवाड(वय-३४) हा तरूण राहत्या निघुन जाऊन बेपत्ता झाला असल्याची खबर चुलते शांताराम गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
सतिश हा शेती मजुरी करून शिरसगाव येथील महाराणा प्रताप कॉलीनीत आई सोबत राहतो. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र रात्र होऊनही न परतल्याने त्याचे चुलते व इतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडे चौकशी करूनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने शांताराम गायकवाड यांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात सतिश बेपत्ता झाल्याची खबर दिली.
त्यानुसार सतिश याचा वर्ण निमगोरा असून उंची ५ फूट ५ इंच आहे. चेहरा उभट, मोठे नाक, बारिक दाढी, शरिराने मध्यम, केस मध्यम काळे, अंगात आकाशी रंगाचा शर्ट, साधी निळी पँट, पायात चप्पल व मराठी भाषा बोलतो असे त्याचे वर्णण आहे. वरील वर्णणाचा किंवा सोबतच्या छायाचित्रातील व्यक्ती कुणाला आढळल्यास ९०२१०९०५७५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन शांताराम गायकवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment