संत गाडगेबाबा महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीस कार्या केले , नगराध्यक्षा अनुराधा आदिक
श्रीरामपूर(वार्ताहर) -समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या,सुसंस्कृत,बुद्धिवादी,विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करावयाची असल्यास,अंधश्रद्धा,कर्मकांड, बुवाबाजी,धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं असे गाडगे बाबांचे परखड मत होते.त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता ,त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीस कार्याचा प्रारंभ केला. असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आझाद मैदानावर संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पूजन केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, ताराचंद रणदिवे,कलीम कुरेशी, अर्चनाताई पानसरे,जयंत चौधरी, डॉ. मनोजकुमार छाजेड,शफीभाई शहा, सैफ शेख, सुधाकर बोंबले,सोहेल शेख,समित मुथा,गोपाल वायंदेशकर,प्रमोद शिंदे, ग्रंथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते.डावखर रोडवरील हनुमान मंदिर येथील मंदिर मध्ये गाडगे बाबा महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे त्यांचे आवडते भजन होते.
यावेळी नगराध्यक्ष आदिक बोलत होत्या, समाजात बदल घडविण्याची ताकत फक्त शिक्षणात आहे.या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला,शाळांसाठी त्यांनी आपल्या जागा दिल्या तसेच जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या.
गाडगेबाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत.ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत.सामान्य माणसाला,मजूरांना,शेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत,मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला पाहिजे असे ते म्हणत.नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना त्यांचा विरोध होता.आपले विचार सर्वसामान्य लोकांना कळावेत यासाठी त्यांनी कीर्तन तसेच ग्रामस्वच्छतेचा उपयोग केला.
त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करते असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या.
श्रीरामपूर - नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आझाद मैदानावर संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पूजन केले यावेळी यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, ताराचंद रणदिवे,कलीम कुरेशी, अर्चनाताई पानसरे,जयंत चौधरी, डॉ. मनोजकुमार छाजेड,शफीभाई शहा, सैफ शेख, सुधाकर बोंबले,सोहेल शेख,समित मुथा,गोपाल वायंदेशकर,प्रमोद शिंदे आदि उपस्थित होते. आदी. (छाया - अनिल पांडे)
No comments:
Post a Comment