Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

संतसेना स्टोअरच्यावतीने मोफत पाणपोयी

संतसेना स्टोअरच्यावतीने मोफत पाणपोयी

श्रीरामपूर-उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर यथील सचिन खजिनकर संचलित संतसेना स्टोअरच्यावतीने एकूण पाच पाणपोयी सुरू करण्याचा मनोदय असून नुकतेच नॉर्दन ब्रँच येथील पाणपोईचे लोकार्पण पार पडले.

            येथील खजिनकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यांना श्री संत सेना नाभिक समाज संघटनेच्यावतीने पाठिंबा मिळाला आहे. नॉर्दन ब्रँच येथील पाणपोई लोकार्पणाप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब वाकचौरे, चंद्रशेखर वाघ, कैलास भागवत, सुभाष महाले, सलिम शेख, विजय निकम, केशव वाघ, जाहिर शेख, डॉ. ढोबळे फिटर, डॉ. परदेशी अनिल व्यवहारे, सुनिल भिसे, रावसाहेब साठी आदी मान्यवर उपसथित होते.

            याशिवाय कोल्हार, बेलापूर आणि इतर ठिकाणीही अशाच पाणपोई सुरू करणार असल्याची माहिती सचिन खजिनकर यांनी यावेळी दिली.


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात