१०५ वर्षांच्या झुंबरबाई पवार यांचे निधन
निधन वार्ता
येथील भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या आजी झुंबरबाई नामदेव पा. पवार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, नातू व पणतू, परतोंडे असा मोठा परिवार आहे. वयाच्या १०५ व्या वर्षी वैजापूर तालुक्यातील माळी सागज याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment