Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन व नागरिकांच्या पाठपुराव्यास यश


मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन व नागरिकांच्या पाठपुराव्यास यश

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचा सत्कार

श्रीरामपूर :- शहरातील वार्ड नंबर ३ अनेक समस्या तातडीने मार्गी लावल्याबद्दल नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचा मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन व नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

येथील वार्ड क्र. ३ मधील हनुमान मंदिर जवळ स्टेट बँक व कुंभार गल्ली जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान चौकात जलवाहिनी फुटून पाणी रस्त्यावर साचले होते. या रस्त्याला वाहनांची मोठी रहदारी असल्याने या ठिकाणी सुमारे दीड  ते दोन फूट खड्डा पडला. त्यामुळे याभागात छोट्या मोठ्या अपघातांना सुरूवात झाली होती याबाबत फाऊंडशनच्यावतीने मुख्याधिकारी शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्या समस्येची तातडीने दखल घेत प्रांताधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागास आदेश दिले. त्यामुळे तात्काळ ही वाहिनी दुरूस्त केल्याने होणारे अपघात टळले. तसेच सावता महाराज रस्त्यावरील पथदिवे बंद होते. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या भागात भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतही फाऊंडेशनच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यांनी तातडीने पथदिवे सुरू करून नागरिकांच्या समस्या कमी केल्या.

मुख्याधिकाऱ्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल वार्ड नंबर ३ मधिल नागरीकयुवा ग्रुप व मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशनच्यावतीने अशोकराव दळे फाऊंडेशन चे सचिव ऋषीकेश मोरगे यांच्या हस्ते त्यांचासन्मान करुन आभार मानण्यात आले. यावेळी भगवान भागवत, राजू परदेशी, निलेश पवार, गणेश क्षीरसागर,मोरगे पाटील बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगेआदी उपस्थित होते.

 

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात