एकलहरे प्रतिनिधी:- श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे मुलीच्या गळ्याला चाकू लावून लाखोंचा ऐवज लंपास ?
उक्कलगाव एकलहरे भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास उक्कलगाव खंडाळा रोड परिसरात 'उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली.
यावेळी चोरट्यांनी सरपंच धोरात यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावुन लाखोंचा ऐवज लंपास केला. उक्कलगाव-खंडाळा रोडवर असलेल्या सरपंच नितीन थोरात यांचा बंगला आहेत. मंगळवारी पहाटे च्या सुमारास त्यांच्या बंगल्याच्या खिडकीतून चोरट्यांनी रुमचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. तेथेच रुममध्ये अभ्यासक्रम आटपून त्यांची मुलगी झोपलेली होती. चोरट्यांनी तिच्या गळ्यास चाकू लावून तिला गप्प करत
धमकावले होते.
तेथून चोरट्यानी तेथील खोलीत असलेल्या नितीन थोरात यांच्या आईची पेटी घेऊन पोबारा केला तेथून चोरट्यांनी शेजारीच राहत असलेल्या किशोर दत्तात्रय थोरात यांच्या
घराकडे वळविला. त्याबरोबर काहीवेळाने एकलहरेतील माजी चेअरमन नूरमहमदः जहागिरदार यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला असता तेथे शेती उपयुक्त अवाजरे कमीकमीत ७० हजारांचे अवजारे चोरून नेल्याची घटना घडली. त्याठिकाणी कपाटाची उचकापाचक करत फाईल्स व कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली व तेथून तीन हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. शेजारीच राहत असलेले अशोक विठ्ठल थोरात यांच्या घरीही ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मागील काही दिवसांपूर्वीच अशोक भानुदास थोरात यांच्या चाकणवस्ती याठिकाणीतील शेतीवरून एसटीपीपय मोटार चोरून नेल्या आहेत.
यांच्या गाडीची बॅटरीही मुकुंद जगधने यांच्या श्रागान्यासमोरुन चोरीला गेली आहेत.
चोरीच्या घटनांची व्याप्ती महाता या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची गरजेचे असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणाही अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्याची गरज आहेत. याप्रकरणी बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, याबाबताचा अधिक तपास सुरू आहे. चौरी करणारे चोरटे सराईत असावेत असा अंदाज वर्तविला जात आहेत. पाळत ठेवून हा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी असून वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर हा प्रकार घडल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लवकरात लवकर सदरच्या घटनेचा तपास लावून भितीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत.
No comments:
Post a Comment