Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

शिक्षकांचे जीवनातील स्थान अनन्यसाधारण -प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे


शिक्षकांचे जीवनातील स्थान अनन्यसाधारण -

प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे

 

 

श्रीरामपूर :- 'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे जीवन संघर्षमय होते. उच्च शिक्षण घेताना आपल्या आईकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी माझ्या गुणवत्तेवरमला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून व शिष्यवृत्तीच्या पैशातून मी माझे शिक्षण पूर्ण करीन. हा आपल्या आईला दिलेला शब्द त्यांनी त्यानंतर पुढे खरा करून दाखविला. तसेच शिक्षकांचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहेअसे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. के.एच. शिंदे यांनी केले.

             रा. ब. नारायणराव बोरावाके महाविद्यालयामध्ये भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती व शिक्षकदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.के.एच. शिंदे बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.मीनाताई जगधने(मॅनेजिंग कौन्सिल सदस्यारयत शिक्षण संस्था,सातारा व चेअरमन रयत शैक्षणिक संकुलश्रीरामपूर) तसेच उपप्राचार्य सौ. पोखरकर मॅडमविज्ञान विभाग प्रमुख प्रा. गोराणे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभषण,डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी पर्यवेक्षक ठोके मयूर याने केले.तर कु. कुताळ प्रियाकु. गायके ऋतुजा व शिनगारे सुशिल यांनी शिक्षकाबद्दलचा आदरभाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

             विद्यार्थी उपप्राचार्य कु. बहिरट भक्ती हिने शिक्षकांचे जीवनातील स्थान व उपप्राचार्य म्हणून आलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.आसने श्वेता व कु. जगताप सायली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.संजय पुलाटे व प्रा.शशिकांत बनकर यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व विभागातील शिक्षकांनी सहकार्य केले.

             कार्यक्रमात शेवटी कु. विटनोर स्नेहल हिने सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी - विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात