श्रीरामपूर:- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी यांच्या विचार, कार्य व कर्तृत्वाचा आदर्श घेऊन त्यांनी जीवनभर कार्य केले. या महामानवांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी भाऊराव चंदनाप्रमाणे झिजले असे प्रतिपादन रयतचे जनरल बॉडी सदस्य मा.प्रकाश निकम पाटील यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त हीरक महोत्सवी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश निकम पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.के.एच. शिंदे, प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, परीक्षक आबासाहेब कापसे, चंद्रशेखर हासे, स्पर्धा समन्वयक डॉ.बापूसाहेब घोडके उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. के.एच. शिंदे यांनी वक्तृत्व ही एक कला आहे .या कलेच्या माध्यमातून आपण समाजाला चांगले नेतृत्व देऊ शकतो. महाविद्यालयीन तरुणांनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभाग घेऊन आपली वक्तृत्व कला विकसित करावी असे आवाहान केले.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बी.के. बिर्ला महाविद्यालय मुंबईचा विद्यार्थी यश पाटील यांनी पटकाविले. दहा हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आप्पासाहेब जेथे महाविद्यालय पुणेचा विद्यार्थी तेजस पाटील यांनी पटकाविले. सात हजार रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगलीचा विद्यार्थी शिवम मालकर यांनी पटकाविले. पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. तर उत्तेजनार्थ क्रमांक पराग बदिरके यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुण्याच्या विद्यार्थ्यांनी पटकविले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून 43 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्पर्धा समन्वयक डॉ.बापूसाहेब घोडके यांनी केले. प्राचार्य सुहास निंबाळकर परीक्षक चंद्रशेखर हसे मनोगत व्यक्त केले. पारितोषिक वितरण निवेदन विवेक मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.महाडदेव यांनी केले तर आभार प्रा.विजय नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमास सहकारी प्राध्यापक कार्यालयीन सेवक स्पर्धक बहुसंख्येने उपस्थित होते.
डाकले महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मा. प्रकाश निकम पाटील प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, परीक्षक आबासाहेब कापसे, चंद्रशेखर हासे, स्पर्धा समन्वयक डॉ. बापूसाहेब घोडके यांच्या हस्ते स्वीकारताना बी.के.बिर्ला महाविद्यालय मुंबईचा विद्यार्थी यश पाटील.
No comments:
Post a Comment