🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

ऑनलाईन चित्रकला कार्यशाळेस राष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद रंगलहरी आर्ट ॲकॅडमीचा उपक्रम


ऑनलाईन चित्रकला कार्यशाळेस राष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद

रंगलहरी आर्ट ॲकॅडमीचा उपक्रम

श्रीरामपूर-: येथील चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत संचलित रंगलहरी आर्ट ॲकॅडीमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला कार्यशाळेस देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे २५० विद्यार्थ्यांनी यासाठी नाव नोंदणी करून चित्रकार भागवत यांच्यासोबत चित्रकलेचा आनंद लुटला.

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच वय ४ ते १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची ऑनलाईन मोफत कार्यशाळेचे आयोजन चित्रकार भागवत यांनी केले होते. या कार्यशाळेस महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली. याशिवाय राज्याबाहेर दिल्ली, कानपूर, आग्रा, जयपूर, कलकत्ता, दिप्रुगड, सिमला, जोथपूर, उज्जैन, चंदिगढ, कोटला, फिरोजपूर, बडोदा, झांसी, मनिपुरम, अरणमडिका, कोची आदी शहरातील विद्यार्थ्यांनी भागवत यांच्यासोबत कार्टून्स रेखाटून आनंद लुटला.

            मुलांमध्ये बाल्यावस्थेपासूनच उत्साह ठासून भरलेला असतो. कलेच्या माध्यमातून त्यास योग्य दिशा मिळू शकते. पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याप्रती सजग राहून या वयातच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्यास सशक्त व संवेदशील पिढी घडण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात दिवाळी, नाताळ, नववर्ष आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या आणखी कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Comments system