रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यवतीने ’माय गणेशा‘ ऑलाईन चित्रकला स्पर्धा
२१ हजारांच्या बक्षिसांची लयलूट; १० सप्टेंबर अंतिम तारीख
श्रीरामपूर:-रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने ‘माय गणेशा’ या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १० सप्टेंबर पर्यंत येथील मुख्य रस्त्यावरील रंगलहरी कला दालनात चित्रे सविकारली जातील. वय वर्षे ६ पुढील कोणीही स्पर्धेसाठी पात्र असून २१ हजार रूपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे विजेत्या स्पर्धकांना दिली जाणार असल्याची माहिती चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत यांनी दिली.
गणपती हा अबाल वृद्धांचा आवडते दैवत आहे. गणेशाची चित्रे काढण्यात सर्वांनाच रस असतो. त्यांच्या छंदाला चालणा देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त कला रसिकांना कलाभिमुख होता यावे यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांची विभागणी वयोगटानुसार तीन गटात करण्यात आली आहे. वय ६ ते १० ज्युनिअर ग्रुप. यात प्रथम बक्षिस रूपये २००१, दवितीय १५०१ तर तृतिय १००१ असे आहे. वय ११ ते १५ सिनीअर ग्रुप प्रथम बक्षिस २५०१, दवितीय २००१ तर तृतिय १५०१, तीसरा गट वय वर्षे १६ व त्यापुढील सर्व खुला गट- यात पहिले बक्षिस ४००१, दवितीय ३५०१ तर तृतिय ३००१ असे एकूण २१ हजार रूपयांहून अधिक बक्षिसांची लयलूट स्पर्धकांना करता येणार आहे.
कुठल्याही माध्यमातील गणेशाचे (गणपती) चित्र असा स्पर्धेसाठी विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांनी चित्र ए३ (१२ इंच बाय १८ इंच) या आकाराच्या कागदावर काढावयाचे असून माध्यमाचे कुठलेही बंधन नाही. अर्थात कुठल्याही माध्यमातील चित्रे स्पर्धेसाठी स्वीकारली जातील. चित्राच्या समोरील बाजूस एका कोपऱ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता, वय व हॉट्सॲप क्रमांक लिहिने बंधनकारक आहे. त्याशिवाय चित्राचा समावेश स्पर्धेसाठी केला जाणार नाही.
१० सप्टेंबर २०२२ पर्यंत ज्यांना चित्र येथील मेनरोडवरील रंगलहरी कला दालनात पोहचतील अशा बेताने पाठवायची असून ज्यांना शक्य नाही त्यांनी वर दिलेला तपशीलासह ७४४८०४४८२५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली चित्रे पाठवावीत असे आवाहन उदावंत व भागवत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment