माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी-मा. चेतन भुतडा
श्रीरामपूर:- सध्याच्या काळात ई-कॉमर्स मध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी आहेत. त्यासाठी ई-मार्केटिंग संकल्पना समजून घ्या. त्यासाठी स्वतःची बौद्धिक क्षमतेचा वापर करून नवनवीन संशोधन करा. स्वतः नवनिर्मितीचा ध्यास घ्या. संशोधनाला प्राधान्य द्या. विमा, व्यापार, सेवा, संशोधन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्या व आपले भविष्य उज्वल करा असे आवाहन श्रीरामपूर लायन्स क्लबचे अध्यक्ष मा. चेतन भुतडा यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभाग व संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयस्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. चेतन भुतडा बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर यांनी भूषविले होते.
प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या संधी शोध घ्या. व्यावसायिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने मोठे व्हा. स्वतःची क्षमता ओळखा. सातत्याने नाविण्याचा शोध घ्या असे सांगितले.
या स्पर्धेत या स्पर्धेत भाग्यश्री मखिजा, यशश्री गुजरामी, आदित्य चतुर, प्रतीक भगत, ऋतुजा म्हसे, प्राजक्ता मुठे, साईप्रसाद तनपुरे, ओमकार भावसार, प्रिन्सि गुप्ता, दीपक लीजा, ऋषिकेश वाणी, देवेंद्र गोरे, अनिकेत यादव, पियुष अहिरे, पूजा शेळके, निकिता लाटे या विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रोजेक्टची निवड झाली आहे.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब बावके, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र कळमकर, प्रा.सुभाष देशमुख प्रा.योगीराज चंद्रात्रे, प्रा.विवेक मोरे, परीक्षक डॉ.प्रवीण बडदे डॉ.अशोक माहुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ. मारुती केकाने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.राजेंद्र कळमकर यांनी मानले. कार्यक्रमास सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
डाकले महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रोजेक्टचे पाहणी करताना मा.चेतन भूताडा, मा.प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, डॉ.राजेंद्र कळमकर, डॉ. मारुती केकाने समवेत विद्यार्थी विद्यार्थिनी.
No comments:
Post a Comment