पत्रकार......
चांगल्या-वाईट प्रत्येक घटनेत
सर्वात आधी तोच दिसतो
अनेकांचे सुख-दुःख मांडणारा
तो खराखुरा पत्रकार असतो
जिथे दुर्दैवी घटना घडली
तिथे धीराने उभा राहतो
काळीज चिरुन टाकणारे दृश्य
धीरगंभीर नजरेने पाहतो
शहीद सैनिकांच्या शौर्याची
कथा सांगतो देशभक्तीने
कितीही हृदय पिळवटले
तरी अश्रु रोखतो सक्तीने
कुणावरही अन्याय झाला तरी
सर्वात आधी तोच चिडून उठतो
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी
हातातील सर्व कामे सोडून पोचतो
दुष्काळ, महापुराच्या व्यथा
सांगताना डोळ्यात येते पाणी
खरेच पत्रकाराच्या भावना
समजून घेत असेल का कोणी…?
दुःखाचा प्रसंग मांडताना
त्यालाही वाटत असेल भीती
प्रसंग कसाही असला तरी
सोडत नाही स्वतःची नीती
अचानक आलेल्या संकटांने
तो बसत नाही रडत
गोर-गरीब, गरजवंतांना
तोच मिळवून देतो मदत
ताज्या बातम्या देण्यासाठी
सतत वणवण फिरत असतो
तहान-भूक विसरून
प्रत्येक बातमी देत असतो
समाजासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराचे
खरे दुःख तुम्ही जाणा
तुम्ही लोकहितासाठी झटताय
असे कधी तरी म्हणा.....
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
No comments:
Post a Comment