आयआयटी व नीट परिक्षेत पेंटागॉन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जिल्ह्यात अव्वल
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भारतात आयआयटी, एम्स, एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेतलेल्या आयआयटी- २०२२ च्या परीक्षेत पेंटागॉन करिअर इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आकाश आरक याने भारतात ९५७ वी रँक मिळवून आयआयटी बॉम्बे या इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तसेच दिव्या गर्जे हिने नीट- २०२२ च्या परीक्षेत ७२० पैकी ६०६ गुण मिळवून शासकीय वैद्यकीय कॉलेज औरंगाबादमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. सलग तीन वर्ष आयआयटीसारख्या प्रतिथयश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देणारी पेंटागॉन इन्स्टिट्युट जिल्ह्यातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरली असल्याची माहिती पेंटागॉन 'क्लासचे संचालक प्रा. तौफिक शेख यांनी दिली.
२०२१ मध्ये पियुष सांगळे याने आयआयटी, मंडी व भाग्यश्री आरोटे हिने आयआयटी, बॉम्बे तर २०२० मध्ये तन्मय वाघ याने आयआयटी गांधीनगर या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळविले. २०२१ मध्ये तन्मय बारहाते याने ७२० पैकी ६३६
गुण मिळवून शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. २०२० मध्ये रचना चौधरी हिने ७२० पैकी ६३४ गुण मिळवून व तेजल संकलेचा हिने ७२० पैकी ६२३ गुण मिळवून शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तसेच २०२२ च्या आयआयटी जेईईच्या परिक्षेत धैर्य सूर्यवंशी याने एनआयटी नागपूर (कॉम्प्युटर सायन्स) मध्ये अॅडमिशन निश्चित केले.
MHT-CET मध्ये ९० टक्केच्यावर गुण मिळवून मयूर चौधरी, रोनित घोडे, दीपा वाकचौरे, श्रद्धा परदेशी, वेदप्रकाश भागडे, प्रेरणा चावला, सिद्धी सोलापूरकर, आदित्य वाघ, भूषण अविष्कार खोसे, मिताली गवारे, वेदांत कोकरे, कुणाल जाधव, प्रणव शेपाळ, अमन शेख, सानिका नेवेवानी अशा शेकडो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग
कॉलेजमध्ये प्रवेश मिळविले आहेत. नीट- २०२२ च्या परीक्षेत पूर्वा गलांडे, अर्जुन डावखर, तनिष्क घोगरे, राज गांधी, साक्षी गदिया, नौशिन शाह यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविले. याव्यतिरिक्त अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय तसेच खाजगी बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस व फिजिओथेरपीमध्ये प्रवेश निश्चित केले असल्याचे क्लासचे संचालक प्रा. निर्मळ यांनी सांगितले.
सलग तीन वर्षाच्या यशस्वी निकालामुळे आयआयटी व नीटच्या तयारीसाठी विद्यार्थी कोटा, लातूर, पुणे, मुंबई येथे न जाता श्रीरामपुरात राहून या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेला माने, प्रचंड यश मिळू शकते, हे पेंटॅगॉन इन्स्टिट्यूटने सिद्ध केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक सर्वश्री प्रमोद निर्मळ, तौफिक शेख, मंगेश रसाळ व सुजित वाकचौरे यांची मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment