छावाचा बेकायदेशीर झिरो तलाठी हटाव आंदोलनाचा इशारा
श्रीरामपूर प्रतिनिधी:- राज्यातील तलाठी कार्यालयात झिरो तलाठी नेमला जात असून त्यांच्यामार्फत शेतकरी व सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होतअसते हे रोखण्यासाठी अनेकदा मागणी करूनही कारवाई झालेली नाही. त्याबाबत हे आता शेवटचे निवेदन असून लवकरात लवकर तलाठ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास छावा संघटनेचे वतीने राज्यव्यापी भव्य झिरो तलाठी हटाव आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्वत्र ग्रामीण भागात शेतकर्यांचे जमिनीचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी महसूल विभाग मार्फत कामगार तलाठी सजा निर्माण करून गावोगाव तलाठी नेमलेले आहेत.
हे तलाठी आपल्या कार्यालयात एक बेकायदेशीर व्यक्ती कामकाजासाठी ठेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतआहे ,याबत आम्ही अक्टोम्बर 2022 ला पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,याना समक्ष भेटून निवेदन दिले असून सर्व जिल्ह्यतील तलाठ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे ,ह्या बेकदेशीर रित्या तलाठी ऑफिसमध्ये बसून शेकर्यांकडून पंचनाम्याचे 200 रु ,7/12उताऱ्याचे 100 ते150रु, नोंद लावण्याचे 500 ते5000रु,वारस नोंदीचे प्रत्येक वारसाकडून 5000 ते 10000रु,खातेफोड करण्याचे 25000 ते35000 रु,कर्ज बोजा लावणे अथवा कमी करणे 500 ते5000 रु,उत्पन्नाचा दाखल 500 रु,एकत्र कुटूंबातील वाटप मनमानी पैसे ,अशाप्रकारे शेतकऱ्यांची राज्यभर लूट होत आहे ,आपण आपल्या नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकार्या मार्फत तलाठी कार्यालयातील बेकदेशीर व्यक्ती ,(झिरो तलाठी ) ठेवणे बेकाययदा आहे, त्या संनधित असून तलाठी यांची मंडळ अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी यांना ही गोष्ट माहीत आहे परंतु कारवाई कोणी करत नाही या निवेदनाची दखल घेऊन आपण अश्या बेकदेशीर व्यक्ती ठेवणाऱ्या तालाठ्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा अखिलभारतीय छावा मराठा युवक संघटन जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील, यांच्याअध्यक्षतेखाली झिरो तलाठी हटाव आंदोलन आपल्या आयुक्त कार्यालया समोर करणार याची नोंद घ्यावी
निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास निर्मळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणनाना देवकर, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल तळोले आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री, पोलीस निरीक्षक नाशिक रोड आदींना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment