Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

डाकले महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.



डाकले महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
 श्रीरामपूर-: येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  याप्रसंगी  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी संचालन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य मा.डॉ.सुहास निंबाळकर यांनी उपस्थितांना शुभसंदेश दिला. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ.बाळासाहेब बावके,  संशोधन व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आर.पी कळमकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सादिक सय्यद, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा.विजय नागपुरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, संगणक विभाग प्रमुख प्रा.योगीराज चंद्रात्रे उपस्थित होते. याप्रसंगी सहकारी प्राध्यापक, कार्यालयीन सेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात