🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

डाकले महाविद्यालयाचा अश्विनी सोलंकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुवर्णपदक व स्ट्रॉंग मॅनचा मानकरी


डाकले महाविद्यालयाचा अश्विनी सोलंकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुवर्णपदक व स्ट्रॉंग मॅनचा मानकरी
श्रीरामपूर:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या अंतरविभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत ९३ किलो वजन गटात एकूण ७९० किलो वजन उचलून अश्विन सोलंकी याने सुवर्णपदक संपादन केले. इतर सर्व वजन गटातील स्पर्धकांवर मात करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा स्ट्रॉंग मॅन हा किताब त्याने संपादन केला आहे. 
या विद्यापीठ स्तरीय स्पर्धा १४ वर्षापासून महाविद्यालयात यशस्वीपणे आयोजित केल्या जात आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्हा या विभागातील खेळाडूंनी  ५४  मुली व ५९ मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पुणे जिल्हा विभागाने २७  गुणांची कमाई करत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले तर अहमदनगर जिल्हा विभागाने १९ गुणांची कमाई करत उपविजेतेपद संपादन केले.
अश्विनी सोलंकी च्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य मा.प्रकाश निकम पाटील, मा.अॅड विजयराव बनकर पाटील, डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ.प्रवीण बडदे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र कळमकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख यांनी त्याचे अभिनंदन केले. या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी डॉ. दत्ता महादम, प्रा. सुभाष देशमुख, प्रा.विजय देशमुख, प्रा.महेश निंबाळकर, प्रा. राजेंद्र सोनवणे इत्यादींनी परिश्रम घेतले.


फोटो कॅप्शन -पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक व विद्यापीठ स्ट्रॉंग मॅन म्हणून निवड झालेल्या म्हणून अश्विन सोलंकी याचा सत्कार करताना डॉ.दत्ता महादम, प्रा.सुभाष देशमुख विजय देशमुख, महेश निंबाळकर प्रा. राजेंद्र सोनवणे व इतर मान्यवर

No comments:

Post a Comment

Comments system